एवढं नालायक सरकार पाहिलंच नाही, सरकारवर विश्वास राहिला नाही- जरांगे पाटील मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडेना क्लिन चिट दिल्याचा गंभीर आरोप!
- Navnath Yewale
- Nov 17, 2025
- 3 min read

अंतरवाली सराटी : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट प्रकरणातील तीन आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. धनंजय मुंडे यांनीच कट रचल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला आहे. धनंजय मुंडे यांच्या मागणीनुसार जरांगे पाटील यांनी नार्कोटेस्ट ला तयारी दाखवत थेट जालना पोलिस अधिक्षकांकडे अर्ज केला होता. जरांगे पाटलांनी चौकशी, तपासणीला सामोरं जाण्याची तयारी दर्शविली मात्र, धनंजय मुंडे यांच्याकडून प्रत्यूर आले नाही त्यामुळे आज जरांगे पाटलांनी पत्रकार परिषदेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
धनंजय मुंडे गेल्या दहा दिवसापासून गायब राहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री आजित पवार यांच्या पायावर लोटांगण घातले. ‘ मला या जरांगे पाटील हत्या कटाच्या चौकशीतून वाचवा म्हणत त्यांच्याकडून क्लिन चिट मिळवल्याचा गंभीर आरोप जरांगे पाटील यांनी केला आहे. आज माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील पुढे म्हणाले की, धनंजय मुंडे याने माझ्याा घातपाताचा कट रचला होता, पण मी सावध, सजग आहे. मला तो मारु शकत नाही, मी मरायला एवढा सस्ता नाही,सगळ्यांची पाठ पुरविणार आहे. आणि असले चाळे करणाराला तर मोजतच नाही. कुठं जेवनातून औषध घाला, गाडी आंगावर घाला, त्यांची पाठपुरवायला मी खंबीर आहे. हे मी सिद्ध पण केलंय आणि त्यालाही कळालंय आता. त्याचं नेटवर्क किती कमजोर आहे, कारण त्याच्या नेटवर्कमधून आम्हाला माहित्या मिळत आहेत कारण आम्ही सुद्धा खुप पुढचे आहोत असंही जरांगे पाटील म्हणाले.
पुढे बोलताना पाटील म्हणाले की, आम्हाला नुकतीच माहिती मिळाली आहे की, त्याने (धनंजय मुंडे) अजित दादा आणि मुख्यमंत्री फडणवीस यांना सांगितलंय की मला जरांगे पाटलांचा जो घातपाताच्या चौकशीतून वाचावा, मला टाळा, मला साथ द्या, मी यानंतर असं काही करणार नाही. मी जर चौकशील गेलो तर मराठ्यांचे लोकं माझ्या लोकांना मारतील. लोकांना म्हणजे त्या जातीला नाही लोकं म्हणजे त्याची लाभार्थी टोळी. या प्रकरणाला दहा बारा दिवस झाले तेव्हापासून तो फरारच आहे. याकाळात त्याने हाच कुटाना केला आहे मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे जाऊन लोटांगण घातले. त्याला माहित आहे मी जर चौकशीला गेलो तर मराठे माझ्या लोकांना म्हणजे त्याच्या लाभार्थी टोळीला मारतील. त्याची जात याच्या मधी पडत नाही आता. हा रोज असले कुटाने करणार त्या बिचार्या वंजार्यांना मधी घेऊन पडतो, ओबीसीला मधी घेऊन पडतो. त्यामुळे त्याने खालच्या स्तराचा शब्द वापरलाय आता माझ्या लोकांना मारतील. अजित पवाराच्या पायावर लोटांगण घेतो म्हणतात. तो आजित पवारही या पापात सहभागी होत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.
आमच्या गरीबांच्या लेकरांचा घातपात करणार आणि त्याला सोडवण्यासाठी अजित पवार ताकद वापरणार. निश्चितच अजित पवार त्यासाठी ताकद वापरतायत कारण एवढं मोठं षडयंत्र रचतोय घातपाताचं माझ्या आणि सरकार त्याला क्लिन चिट देत असल्याचा अरोप त्यांनी केला.
मुख्यमंत्री फडणवीस साहेबांकडेही हिच विनंत त्याने केली तेव्हा त्याला चौकशीतून टाळलं , फडणवीस साहेब तुम्ही असे लोक सोडणार. संतोष भैय्याचा खून केला त्यातूनही तुम्ही सोडलं, महादेव मुंडेच्या प्रकरणातून तुम्ही सोडलं, बाप्पु आंधळेच्या प्रकरणात हाच आहे सगळ्या प्रकरणात हाच आहे. तुम्ही सोडून देणार,आज माझा घातपाताचा विषय बघा त्याची ती स्टाईल आहे काम करायची. ज्याचा खून करायचा त्याच्या जवळचे लोक वापरायचे. अशी त्याची पद्धत आहे. तुम माझ्या नादी लागला एवढं ध्यानात ठेव तुला जरी अजित पवारांनी याच्यातून टाळलं असंल, तुला देवेंद्र फडणवीसांनी क्लिन चिट दिली असंल. तु लई वाईट काम केलेलं आहेत एवढं ध्यानात ठेव. देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा त्याला शंभर टक्के टाळलंय चौकशीतून शंभर टक्के क्लिन चिट दिली असंही जरांगे पाटील म्हणाले.
शिवाय, दहा बारा दिवस फरार जो होता धनंजय मुंडे याने नेत्यांना भेटून हाच उद्योग केला. त्याला केवळ चौकशीपासून बाजूला राहायचं होतं. आता आमचा सरकारवचा विश्वास उडालाय,‘ एवढं नालायक सरकार आम्ही बघीतलच नाही कधी’ एखद्या लेकराचा घातपात करायला लागले तर सरकारची जबाबदार असते. हे प्रकरण न्यायालाच, आणि कडीलाच लावायचं. घातपाताचा कट रचणाराला तुम्ही वाचवता, तो चौकशीतून टाळा म्हणाला आणि तुम्ही टाळायला लागलात.
वर्षाबंगल्यावरून सांगीतलं 24 तारखेला पुजा कर वैद्यनाथाची आणि लाग प्रचाराला हे पण सांगीतलयं. मुख्यमंत्री फडणवीसांनी यामध्ये राजकारण करायला नको होतं, अजित पवारांनी तर अजिबात करायला नको होतं. फडणवीस साहेब त्याच्या पापात भागीदार होवू नका. समाजाचं काम करणार्याचा जर तो घातपात करायला निघाला तर त्याच्यात कोणी राजकारण करू नये असं अवाहनही जरांगे पाटील यांनी केले.
आरोपीला वकीलं कोण आहेत ते बघा, तुम्ही काय वेड्यात काढता का आम्हाला. जसा जीआर काढला तसा मी एक भ्र शब्दसुद्धा फडणवीस साहेबांच्या, अजित पवारांच्या, एकनाथ शिंदेच्या विरोधात बोललो नाही. मग आता त्याने माझ्या घातापाच्या प्रकरणात तुम्ही सखोल जायला पाहिजे व्हतं, चौकशी करायला पाहिजे होती का नाही केली. आम्ही मराठे शांत केलेत का नाही, आणि मराठ्यांना माझी विनंती आहे तुुम्ही शांत रहा मी पाठपुरवतो याची. आमचा सरकारवर विश्वास राहील नाही कसा राहील. एवढे पुरावे असताना तुम्ही त्याला चौकशीला बोलवत नाहीत. आरोपी सोबत बोलतोय, आरोपीची आणि त्याची रेस्टे हाऊसला बैठक झाली. असे ढळढळीत पुरावे असतानाही चौकशीतून टाळता म्हणजे याला काय म्हणायचं असा संतापही जरांगे पाटील यांनी व्यक्त केला.



Comments