एसआयटीची मोठी कारवाई, मंत्री पंकजा मुंडेच्या पीएला पुन्हा अटक, ती आत्महत्या नव्हे हत्या?
- Navnath Yewale
- Dec 15, 2025
- 1 min read

मुंबई: मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नी गौरी हिने आत्महत्या केली होती. या प्रकरणी वरळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गौरीच्या आई- वडिलांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप केला होता. पोलिसांनी अनंत गर्जेला अटक केली होती, मात्र, तो जामिनावर तुरुंगाच्या बाहेर आला होता.
सरकारने या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटीची स्थापना केली. आता एसआयटीकडून अनंत गर्जेला अटक करण्यात आली असल्याची माहिती आहे. अनंतला दुसर्यांदा अटक केली असल्याने गौरीचा घातपात झाल्याची चर्चा आहे. दरम्यान, अनंतला नेमकी कशासाठी अटक केली याची माहिती समजू शकली नाही.
अनंज गर्जेवर गौरीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा वरळी पोलिसा ठाण्यात गुन्हा दाखल आहे. मात्र, आपल्या मुलीने आत्महत्या केली नसून तीची हत्या केली असल्याचा आरोप गौरीच्या वडिलांनी केला होता. त्यानंतर या प्रकरणी एसआयटी स्थापन करण्यात आली होती.
गौरी हिने 22 नोव्हेंबरला गळफास घेत आत्महत्या केल्याचे समोर आले होते. अनंत याचे विवाहबाह्य संबंध होते. याची माहिती गौरीला मिळाली होती तेव्हापासून अनंत, त्याचा भाऊ आणि बहिण हे गौरीचा छळ करत होते. तसेच माहेरी काही सांगितले तर अनंत हा आत्महत्येची धमकी देत होता. तेव्हापासून गौरी ही मानसिक तणावात होती, असे तिच्या वडिलांनी सांगितले होते. मात्र, आपली मुलगी ही आत्महत्या करणारी नसून तिची हत्या करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले होते.



Comments