एसटी कर्मचार्यांच्या वेतनप्रश्नी सरनाईक आक्रमक वित्त विभागाच्या अधिकार्यांकडे दर 5 तारखेला स्वत:जाणार
- Navnath Yewale
- Apr 11
- 2 min read

मुंबईत आज एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदाचा पदभार परिवनमंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वीकारला. त्यावेळी त्यांनी एसटीसंबंधी विविध मुद्यावर भाष्य केले. या महिन्यात एसटी कर्मचार्यांना आतापर्यंत केवळ 56 टक्केच वेतन मिळाले आहे. त्यानंतर मंगळवारी उर्वरित वेतन दिले जाईल असे अश्वासन देण्यात आले. याच वेतनाच्या प्रश्नावर परिवहन मंत्री सरनाईक यांनी आक्रमक भूमिका घेत थेट सर्व प्रोटोकॉल बाजूला ठेवून दर महिन्याच्या 5 तारखेला वित्त विभागाच्या अधिकार्यांकडे जाणार असल्याचे सांगितले.
सरनाईक म्हणाले
आमचे एसटीचे कर्मचारी आहेत त्यांना पगार वेळेवर मिळाला पाहिजे. या दिवशी घोषणा करतो की, कोणत्याही परिस्थितीत आपल्या एसटी कर्मचार्यांचे पगार हे 7 तारखे पर्यंत मिळालेच पाहिजे. आणि त्यासाठी सर्व प्रोटोकॉल सोडून परिवहन मंत्री या नात्याने मी वित्त विभागाच्या अधिकार्यांकडे दर महिन्याच्या 5 तारखेला स्वत: जाणार आहे. जेणेकरुन त्यांना जाणीव हाईल की मंत्र्यांनासुद्धा आपल्या कार्यालयात यावे लागते. जे उद्या पैंसे द्यायचे आहेत ते आजच द्यायला पाहिजे. शेवटी कामगारांच्या पगारावर कुटुंबाच्या खर्चाचे महिन्याचे नियोजन ठरते. आजच वित्त खात्याच्या अधिकार्यांकडे जाणार आहे. त्यांच्याशी चर्चा करणार आहे.
आम्ही भीक मागत नाही तर आम्ही आमचा अधिकार मागतो आहे. जर ते मिळत नसेल तर ते अयोग्य आहे. पगार जसा शासकीय कर्मचार्यांना वेळेवर दिला जातो. तशाच पद्धतीने एसटी कर्मचार्यांनाही पगार वेळेवर दिला पाहिजे. ती वित्त खात्याची जबाबदारी आहे. वित्त खात्याच्या अधकिार्यांशी बोललो होतो की आम्ही काही अवास्तव मागणी करत नाही. ती जर पूर्ण होत नसेल तर शोकांतिका आहे.
... तर मला जेलमध्ये जावे लागेल
काही दिवसांपूर्वी मला एसटीच्या वरिष्ठ अधिकार्याने सांगितले की, आपण पगार पूर्ण देऊ पण पीएफ चे पैंसे तसेच इतर पैंसे जसजसे आपले उत्पन्न होत जाईल त्यानूसार भरत जाऊ मला हे बिलकूल चालणार नाही. आज मी अध्यक्ष म्हणून सही केली. उद्या जर पीएफचे पैंसे आपण कर्मचार्यांचे पैंसे असे वापरले तर तुम्हालाही जेलमध्ये जावे लागेल आणि मलाही जेलमध्ये जावे लागेल. त्यामुळ—— पीएफचे पैंसे कुठल्याही प्रकारे वापरायचे नाहीत असा निर्णय घेतला आहे.
Comments