ऐन दिवाळीत महारष्ट्राला मिळाले 47 नवे अपर जिल्हाधिकारी
- Navnath Yewale
- Oct 20
- 2 min read

देशभरात दिवाळीचा सण उत्साहात साजरा होत असून दिवाळी बोनसही अनेक कर्मचार्यांना मिळालं आहे. त्यामुळे सणाचा आनंद वाढला आहे. त्याचदरम्यान राज्य सरकारने महसूल विभागातील अधिकार्यांसाठी एक खूशखबर दिली आहे. गेल्या दहा वर्षापासून बदल्यांच्या प्रतिक्षेत असलेल्या अधिकार्यांना गोड बढत्या झाल्याची बातमी मिळाली आहे.
आज राज्याच्या महसूल विभागातील 47 अधिकार्यांना बढत्या देण्यात आल्या आहेत. त्यानुसार महाराष्ट्राला नवे 47 अपर जिल्हाधिकारी मिळाले आहेत. गेल्या काही वर्षापासून अधिकार्यांच बढत्या रखडल्या होत्या. ऐन दिवाळीसनाच्या पहिल्याच दिवशी राज्य सरकारकडून आज शासन आदेश जारी करण्यात आला आहे.
आज राज्याच्या महसूल विभागातील 47 अधिकार्यांना बदल्या देण्यात आल्या आहेत. त्यानुसार महाराष्ट्राला नवे 47 अपर जिल्हाधिकारी मिळाले आहेत. गेल्या काही वर्षापासून अधिकार्यांच्या बढत्या रखडल्या होत्या ऐन दिवाळीच्या पहिल्याच दिवशी राज्य सरकारकडून आज शासन आदर्श जारी करण्यात आली आहे.
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महसूल अधिकार्यांनाही पदोन्नतीची दिवळी भेट दिली आहे. आज मंत्रालयातील दालनात जाऊन बावनकुळे यांनी राज्यातील सर्व जिल्ह्यातील महसूल अधिकार्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. त्यानंतर बढत्यांची घोषणा केली. महसूल विभाग जनेतेच्या अशा, आकांक्षाना मूर्तरुप देणारा विभाग आहे.
हा विभाग अधिकाधिकपणे जनताभिमुख व्हावा. पारदर्शी रहावा. यासाठी सगळे मिळून प्रयत्न करू. सर्वसामान्य जनतेशी थेट संबंध येणार्या मोजक्या शासकीय विभागांपैकी एक विभाग असल्याचं बावनकुळे यावेळी म्हणाले.
दरम्यान, अधिकार्यांच्या पद पात्रता तपासून त्यांच्या बदल्या केल्या गेल्या आहेत. तसेच पदोन्नत झालेले अधिकारी जर 30 दिवसांचे आत रूजू न झाले नाहीत तर त्यांच्यावर महाराष्ट्र नागरी सेवा ( शिस्त व अपिल) नियम 1997 मधील तरतुदीनुसार शिस्तभंग कारवाई केली जाणार आहे.
सामान्य प्रशासन 15 ऑक्टोबर रोजीच अतिवृत्तान्वय, अस्थापना मंडळ ( क्रमांक 2) यांनी अपर जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकार्यांची अपर जिल्हाधिकारी ( निवडश्रेणी) या पदोन्नोतीच्या पदाची पात्र पात्रता तपासून निवड सूची वर्षे 2025 मध्ये अप जिल्हाधिकारी (गट-अ) ( वेतनश्रेणी एस 25-178800-209200) या संवर्गातील पात्र अधिकार्यांना अपर जिल्हाधिकारी (निवड श्रेणी) (गट-अ) (वेतनश्रेणी एस 27-11, 23, 1100-2,15,900) या संवर्गात नियमित पदोन्नती कोट्यातील रिक्त पदांवर निव्वळ स्वरुपात पदोन्नती देण्यातबाबत शिफारस करण्यात आलेली आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम 1981 मधील नियम 63(6)(3) मधील तरतुदनुसार पदोन्नत अधिकारी 30 दिवसांचे आत रूजू न झाल्यास सरदचे आधिकारी महाराष्ट्र नगारी सेवा (शिस्त व अपिल) नियम 1979 मधील तरतुदीनुसार शिस्तभंग विषयक कारर्वास पात्र राहतील. 15. उपरोक्त पदोन्नत अधिकार्यांना कळविण्यात येते की, नवीन नियुक्तीच्या ठिकाणी रुजू झाल्याबाबतचा अहवाल शासनाच्या ई-मेलद्वारे, टपालद्वारे शासनास त्वरीत कळवावे, असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.



Comments