ऑपरेशन ‘सिंदूर’अंतर्गत 100 दहशतवाद्यांचा खातमा; डीजीएमओ ने पुरावेच दाखवले
- Navnath Yewale
- May 11
- 1 min read

जम्मु काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहिम राबवली. दरम्यान, या मोहिमेत पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे नऊ तळं उद्धवस्त करण्यात आले. भारताच्या ऑपरेशन सिंदूर नंतर बिथरलेल्या पाकिस्तानने जम्मू काश्मीर, राजस्थान, पंजाब प्रांताच्या सीमावर्ती भागात ड्रोन, मिसाईल हल्ल्याचा प्रयत्न केला. मात्र, भारतीय लष्कराने पाकिस्तानचे हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर दिले. भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून जवळपास 100 दहशतवाद्यांचा खातमा केल्याचे पुरावेच डीजीएमओ लेप्टनंट जनरल राजीव घई यांनी पत्रकार परिषदेत दिले.
ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने एअर स्ट्राईक करत पाकिस्तानमधील 9 दहशतवादी तळांवर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात 100 हून अधकि दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती डीजीएमओ लेप्टनंट जनरल राजीव घई यांनी दिली आहे.
भारताच्या हल्ल्यात युसूफ अजहर, अब्दुल मलिक आणि मुदसिर अहमद ठार झाल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. तिन्ही सशस्त्र दलांची आज पत्रकार परिषद पार पाडली असून यावेळी सॅटेलाईट फोटो दाखवत पुरावे सादर करण्यात आले. या फोटोमधून भारताने केलेली कारवाई आणि पकिस्तानचं झालेलं नुकसान याचे पुरावे मिळाले आहेत.
Comments