top of page

ऑपरेशन सिंदूर नंतर दोन्ही देशांची युद्धबंदीची घोषणा?



भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमिवर, दोन्ही देशांनी युद्धबंदीची घोषणा केली आहे. शनिवारी संध्याकाळी 5 वाजल्यापासून युद्धबंदी लागू झाली आहे. मात्र, शनिवारी रात्री पाकिस्तानकडून गोळीबार झाल्याची माहिती आली. ज्याला भारतीय सैन्यदलाने योग्य प्रत्यूत्तर दिले. त्याच वेळी, लोकांच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला की, भारतीय सैन्याचे ‘ ऑपरेशन सिंदूर’ देखील संपले आहे का? हवाई दलाने याबाबत निवेदन जारी केले आहे.


हवाई दलाचे निवेदन : ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत नियुक्त केलेली सर्व कामे अचूक आणि व्यवसायिकतेसह यशस्वीरित्या पार पाडली गेली. ही मोहिम राष्ट्रीय उद्दिष्टांनुसार, सुनियेाजीत आहे गोपनिय पद्धतीने राबविण्यात आली. ऑपरेशन अजूनही सुरू असल्याने , योग्य वेळी सविस्तर माहिती शेअर केली जाणार आहे.


भारतीय हवाई दलाचे अवाहन : भारतीय हवाई दलाने नागरिकांनी कोणत्याही प्रकारचे अनुमान लावू नये आणि असत्यापित माहिती पसरवू नये असे अवाहन केले आहे. युद्धबंदी शनिवारी सायंकाळी 5 वाजल्यापासून लागू झाली आहे. भारताच्या परराष्ट्र सचिवांनी पत्रकार परिषदेद्वारे ही माहिती दिली. मात्र, रात्री पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले, ज्याला भारतीय सैन्यदलाने योग्य उत्तर दिले.

Comentarios


bottom of page