top of page

ओडिशात माणवतेला काळीमा; एका मुलीवर 10 नराधमांचा सामूहिक अत्याचार


ओडिशाच्या गंजम जिल्ह्यातून 20 वर्षीय मुलीवर क्रूरतेचा प्रकार समोर आला आहे. ही विद्यार्थीनी रविवारी मित्रासोबत गोपाळपूर समुद्रकिनार्‍यावर गेली होती. दोघेही समुद्रकिणार्‍याच्या थोड्याशा निर्जन भागात होते. तिथे मोटारसायकलवरून आलेल्या 10 अज्ञात तरुणांनी त्यांच्यावर हल्ला केला. पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली आहे. शिवाय हे प्रकरण आता राज्याच्या राजकारणातही जोर धरत आहे.


मजी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी या घटनेचा निषेध केला आणि म्हटले की, अशा घटना पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत अनेक प्रश्न उपस्थित करतात. राज्याच्या उपमुख्यमंत्री प्रविता परिदा म्हणाल्या की, ही दुर्दैवी घटना आहे पोलिसांनी तातडीने कारवाई केली आणि 10 आरोपींना अटक करण्यात आली आहे. पीडितेला सर्वतोपरी मदत केली जाईल.


ओडिशा पोलिसांनी जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, ही मुलगी जवळच्या जिल्ह्यातील रहिवासी आहे आणि ती बेरहमपूरमधील एका खासगी मेसमध्ये राहून शिकत आहे. तिचा मित्रही तिच्यासोबत कॉलेजमध्ये शिकतो. पोलिसांनी सांगितले की, दोघेही समुद्रकिनार्‍याच्या एका निर्जन भागात बसले होते.


त्यानंतर सुमारे 10 जणांचा एक गट तिथे पोहोचला आणि आरोपीने प्रथम दोघांचे फोटो काढले आणि ते इंटरनेटवर टाकण्याची धमकी दिली. त्यानंतर आरोपीने तरुणाचे हात-पाय बांधले आणि पिडीतेला एका निर्जन घरात घेऊन गेले. येथे 10 जणांनी तिच्यावर अळीपाळीने अत्याचार केला.


माजी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केले आणि म्हणाले की, ओडिशातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या गोपाळपूर समुद्रकिनार्‍यावर सामूहिक अत्याचाराची घटना अत्यंत दु:खद आहे आणि आपण सर्वजन त्याबद्दल हादरलो आहोत. आम्ही या घटनेचा तीव्र निषेध करतो. पर्यटनस्थळांवर महिलांच्या सुरक्षेवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सरकारने या प्रकरणात सतर्क राहण्याची गरज आहे. आणि महिलांच्या सुरक्षेसाठी ठोस पावले उचलली पाहिजेत.


राज्याच्या उपमुख्यमंत्री प्रविता परिदा म्हणाल्याकी, ही घटना दु:खद आहे. परंतु पोलिसांनी त्वरित कारवाई केली आहे. सर्व आरेापींना अटक करण्यात आली आहे. आमचे सरकार महिलांच्या सुरक्षेच्या मुद्यावर गंभीर आहे या घटनेनंतर पर्यटन स्थळांवरही सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

टिप्पणियां


bottom of page