कपिल सिब्बल यांची मोठी घोषणा; कॉक्रोच जनता पार्टीला कायदेशीर लढाईसाठी एक कोटी

नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी कॉक्रोच जनता पार्टीला न्यायालयीन लढ्यासाठी तब्बल एक करोड रुपये मदतीची घोषणा केली आहे. सीजेपीच्या आंदोलनात सहभागी झालेल्या आंदोलकांवर दाखल झालेल्या विविध खटल्यांच्या विरोधात कायदेशीर लढाई लढण्यासाठी कपिल सिब्बल यांनी एक कोटी रुपयांच्या आर्थिक मतदीची घोषणा केली आहे. कपिल सिब्बल यांनी देशभरातील वकिलांना कॉक्रोच जनता पार्टीच्या मदतीसाठी पुढे येण्याचं आवाहन केलं आहे. आपल्यासारखं इतरही वकील किंवा नागरिक कायदेशीर लढाई लढण्यासाठी कॉक्रोच जनता पार्टीला आर्थिक मतद करू शकतात. अशाप्रकारच्या मदतीसाठी पुढे येण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.
कॉक्रोच जनता पार्टीचे प्रवक्ते सौरव दास आणि कपिल सिब्बल यांची एकत्र पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत आधी सौरव दास यांनी भूमिका मांडली. यानंतर कपिल सिब्बल यांनी भूमिका मांडली. “ आमचे आंदोलन सुरू असताना काही जणांनी कोर्टात जनहित याचिका दाखल केल्या. या याचिका राजकारणाशी प्रेरित आहेत. आम्ही उभी केलेली चळवळ कोर्टाच्या मदतीने संपवली जाऊ नये अशी आमची इच्छा आहे. त्यामुळे आम्ही ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांच्या नियमित संपर्कात होतो. आम्ही त्यांच्याकडून कायदेशीर सल्ला मागितला होता.” अंस सौरव दास म्हणाले.
“ आम्ही 25 जुलैला आंदोलन मागे घेतलं त्यानंतर वातावरण शांत झाल्यानंतर कदाचित हे सरकार आंदोलनात सहभागी झालेल्यांना वैयक्तिकरित्या टार्गेट करू शकतं. कारण दुसर्या चांगल्या आंदोलनामध्येदेखील अशाचप्रकारे लोकांना खोट्या गुन्ह्यांखाली फसवण्यात आलं आहे. त्यामुळे कॉक्रोच जनता पार्टी सर्व विद्यार्थ्यांसाठी पहिल्या दिवसापासून कायदेशीर आणि वैद्यकीय मदत करत आहे. वकीलांसोबत बातचित करून देशभरातील विद्यार्थ्यांना मदत करत आहे. आम्ही याच पार्श्वभूमिवर कपिल सिब्बल यांचे मार्गदर्शन घेतलं होतं. त्यांच्या काही सूचना आहेत.” अशी माहिती सौरव दास यांनी दिली.
कपिल सिब्बल म्हणाले, “ जे विद्यार्थी आंदोलनात सहभागी झाले त्यांच्यावर कोणतीही कारवाई होऊ नये. कारण ही एक नैसर्गिक चळवळ होती. कुठलंही सरकार असेल तर ते आपल्या विरोधात अशाप्रकारे कुणी आंदोलन करू नये , असं नेहमी इच्छित असंत. सीजेपीला सरकारने काही अश्वासन दिलं असेल. त्याबद्दल मी बालू इच्छित नाही. पण ते माझ्याजवळ कायदेशीर लढाईसाठी मदतीसाठी आले तर मी त्यांना मदत करण्याचं अश्वासन दिलं.” असं कपिल सिब्बल यांनी सांगितलं.
“ देशात कोणत्याही राज्यात शांततेत आंदोलन झालं आहे, तिथे विद्यार्थ्याना टार्गेट केलं जात आहे, या विद्यार्थ्यांविरोधात गुन्हा दाखल केला जात असेल तिथे आपण एक व्यवस्था उभी करु, जेणेकरून तिथे आपले काही वकील उभे राहतील. विद्यार्थ्यांवर कोणतीच कारवाई व्हायला नको. गुन्हा दाखल झाला असेल तर तो मागे घेतला जावा.” असं कपिल सिब्बल म्हणाले.
सीजेपी वेबसाईट बनवणार : “सीजेपी वेबसाईट बनवणार आहे. तिथे कोणत्या ठिकाणी कोणत्या विद्यार्थ्यांवर कारवाई झाली आहे त्याची माहिती दिली जाईल. तिथे वकिल स्वत:हून मतदतीसाठी समोर येऊ शकतात. ते कशाप्रकारे मदत करू शकतात, त्यांना काही पैसे द्यावे लागतली का? याबाबत वकिलांशी संपर्क करता येईल.” असंही सिब्बल म्हणाले.
केवळ कायदेशीर लढाईसाठी फंडाचा वापर : “ ज्या विद्यार्थ्यांवर चुकीच्या पद्धतीने कारवई होईल त्यांच्यासाठी या फंडाचा वापर होईल. या फंडाचा दुरुपायोग होणार नाही. या फंडाच्या डिसबसमेंटसोबत माझं काही घेणंदेणं राहणार नाही. मला केवळ योगदान द्यायंच आहे. ते मी घोषित केलं आहे. बाकी काय करावं आणि काय नाही करावं ही सीजेपीची जबाबदारी आहे.” असं कपिल सिब्बल यांनी स्पष्ट केलं.
“ दिल्ली पोलिस चेहर्यांची पडताळणी करून जो आंदोलनाला आला आहे, त्याला टार्गेट करेल. संबंधित विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचा छळ करण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जाऊ शकतो.” असा आरोपही कपिल सिब्बल यांनी केला.
पुढे बोलताना सिब्बल म्हणाले “ हे बघा सीजेपीचं आंदोलनासोबत मी कधी जोडलो गेलो नाही. पण जे हिंदू-मुस्लिम करतात ते सर्व ठिकाणी करतील. कारण त्यांचा तोच उद्देश आहे. ते आम्हाला भारतात होऊ द्यायचं नाही. ही चळवळ भारतातील सुधारणेसाठी आहे. ही सुधारणा तेव्हाच हाईल जेव्हा सर्व जाती-धर्माचे लोकं एकत्र येऊन सहभागी होतील. माझा रोल हा बाहेरुन कादेशीर पाठिंबा देणं हेच आहे.” अशी भूमिका कपिल सिब्बल यांनी मांडली.



Comments