करुणा मुंडेचा व्हायरल व्हिडिओवर संताप ! थेट कार्यकर्त्यांची नावे धक्कादायक आरोप
- Navnath Yewale
- Apr 8
- 1 min read

धनंजय मुंडे यांच्या विरोधात सातत्याने आवाज उठवणाऱ्या करुणा शर्मा पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. सोशल मीडियावर त्यांच्या काही खासगी क्षणांचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांनी फेसबुकवर थेट प्रतिक्रिया दिली आहे. “माझे तसले व्हिडीओ व्हायरल करून मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे,” असा थेट आरोप करत त्यांनी या कारवाईमागे काही राजकीय शक्ती असल्याचं सूचित केलं आहे.
मी खचणारी नाही”-
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर फेसबुकवर लाईव्ह येत करुणा शर्मा म्हणाल्या, “माझ्या खासगी जीवनात घुसखोरी करून, मला बाई म्हणून खाली दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. पण मी आता थांबणार नाही.” त्या पुढे म्हणाल्या की, “या व्हिडीओमुळे मी तुटणार नाही, उलट यातूनच मी अधिक बळकट होईन.” तसंच त्या म्हणाल्या की, “माझ्या विरोधात जी खेळी खेळली जाते आहे ती मी ओळखतेय. पण मी आता सर्व पुरावे उघड करणार असून, कोणकोणत्या व्यक्तींनी हे व्हिडीओ व्हायरल केले, याचाही तपास व्हायला हवा.”
राजकीय सूडाचं स्वरूप घेतोय वाद?
करुणा शर्मा यांनी यापूर्वीही धनंजय मुंडेंवर वैयक्तिक आणि राजकीय आरोप केले होते. आता त्यांच्याच खासगी क्षणांचे व्हिडीओ सोशल मीडियावर पसरवले जात आहेत, यामुळे हा वाद आता अधिकच गंभीर व वादग्रस्त स्वरूप धारण करत आहे. करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे यांच्यातील वाद पूर्वीही चर्चेत राहिला आहे. त्यात वैयक्तिक संबंधांपासून ते राजकीय आरोपांपर्यंत अनेक मुद्दे समोर आले. आता पुन्हा करुणा शर्मांनी आक्रमक भूमिका घेतल्याने हे प्रकरण नव्याने तापण्याची शक्यता आहे.
सामाजिक माध्यमावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये करुणा शर्मांनी आपला आक्रोश व्यक्त केला. त्यांनी धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप करत त्यांच्यावर अनेक स्तरांवर अन्याय केल्याचं सांगितलं. त्या म्हणाल्या, “धनंजय मुंडे यांची मुखवटेधारी बाजू आता लोकांसमोर आणणार आहे.
त्यांनी जे काही केलंय त्याचा पूर्ण हिशोब आता दिला जाईल.” तसेच त्यांनी स्पष्ट केलं की, “मी मागे हटणारी नाही. हे माझं युद्ध आहे आणि हे मी शेवटपर्यंत लढणार आहे.” या व्हिडीओमध्ये करुणा शर्मा पूर्णपणे संतप्त स्वरूपात बोलताना दिसतात आणि मुंडेंना थेट आव्हान देत आहेत.
Comments