कर्तव्यापलिकडच्या निसर्गदूताने दिला मानवतेचा संदेश कार्यालयाच्या आवारात तहसीलदाराने स्वखर्चाने केली वृक्षलावगड; झाडे जगवण्यासाठी घेतला पुढाकार
- Navnath Yewale
- Feb 20
- 1 min read

बीड : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वनक्षेत्रात वाढ हाच एकमेव पर्याय आहे. त्यामुळे वृक्षलागवड मोहिमेला व्यापक चळवळीचे स्वरुप प्राप्त होणं महत्वाचं आहे. वृक्षलागडीचे फलित होण्यासाठी वृक्ष संरक्षण, संवर्धनाच्या उपाय योजनां चळवळीमध्ये रुपांतरीत होणं गरजेचं आहे असाच संदेश देत बीडच्या शिरुर कासारचे तहसीलदार सुरेश घोळवे यांच्यातील निसर्गदुताने दिला आहे.
नैसर्गीक साधनसंपत्तीचे जतन, हाच पर्यावरणीय बदलांवर उपाय हे सुर्य प्रकाशाइतके सत्य आहे. वातावरणातील नैसर्गीक बदलांमुळे माणुस खडबडून जागा होताना दिसून येत आहे. सामाजिक, शासनस्तरावरुन वृक्षलागवडचा प्रचार, प्रसारासह व्यापक जागृतीमुळे अगदी बालमनावर वृक्षमहत्व बिंबत आहे. त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत असले तरी संरक्षण संवर्धणासह वृक्षजगवण्यासाठी उपाय योजनांची क्रांतीच माणवतेला तारु शकते. यासाठी लाखो हातांसोबत निसर्गप्रेमाच्या माणसीकतेची गरज असल्याचा संदेश शिरुर कासार तालुक्याचे तहसीलदार सुरेश घोळवे यांनी दिला आहे.
कर्तव्याच्या पलिकडे निसर्गाशी माणवतेच्या अतुट नात्याची जानिव करुन देण्यासाठी तहसीलदार सुरेश घोळवे यांनी आपल्यातील निसर्गदूत जागृत केला आहे. शिरुर कासारच्या झापेवाडी शिवारातील सर्वे नंबर 51 मधील ओसाड माळरानावर खडकाळ जमिनीत आधिच्या वृक्षांना सवंगड्याची साथ मिळावी यासाठी स्वर्चाने जांभूळ,पाम, कन्हेर, रबर, नारळ, वड, पिंपळ, चाफा प्रजातीचे शेकडो दिर्घआयुष्यी स्वजाती वृक्षरोपे खरेदी केले. बीड येथील खासगी नर्सरितून वृक्षरोपे खरेदी करून आठवड्यातील वारांचे वृक्षांना नामकरण करत शास्त्रीय पद्धतीने तहसील कार्यालयाच्या आवारत वृक्षारोपन केले.
जबाबदारीतून कर्तव्य बजावताना कार्यालय आवारातील वृक्षांची कायम प्रेरणा मिळत राहावी या उद्देशाने वृक्षजगवण्यासाठी संरक्षण, संवर्धनाच्या उपाय योजनांसह पाण्याची जबाबदारीही त्यांनी कार्यालयातील वृक्षप्रेमींवर सोपवली. तहसीलदार सुरेश घोळवे यांचा हा अभिनव उपक्रम प्रेरणास्थानी आहे. प्रशासन सेवेतील प्रत्येक जबाबदार हातांनी या मोहिमेला व्यापक बळ देण्याची गरज आहे. शुक्रवारी जांभुळ वृक्षलागवड करताना तहसीलदार सुरेश घोळवे, नायब तहसीलदार गणेश दहिफळे, महसूल कर्मचारी अतुल कातखडे, बाबासाहेब बर्डे, प्रशांत आगलावे, अविनाश काकडे, नितीन जाधव यांच्यासह निसर्गप्रेमींनी सहभाग घेतला, तहसीलदार घोळवे यांच्या उपक्रमांचे सर्वस्तरातून स्वागत होत आहे.



Comments