कल्याणमधून बेपत्ता झालेल्या चार शाळकरी मुली राजस्थानात सुखरुप सापडल्या
- Navnath Yewale
- Jul 3
- 1 min read

कल्याण : कल्याणमधून एक धक्कादाय घटना समोर आली आहे. नॅशनल उर्दु हायस्कुल या शाळेतील आठवी आणि नववीत शिकणार्या चार अल्पवयीन मुली (दि.29 जून) रोजी बेपत्ता झाल्या होत्या. या मुलींच्या पालकांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या मुली कल्यावण पासून 904 किलोमिटर लांब राजस्थान राज्यात सापडल्या. या मुली राजस्थानात कशा पोहचल्या याबाबत पोलिस तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे.
नॅशनल उर्दु हायस्कूलमधे आठवी व नववी वर्गात शिकणार्या चार अल्पवयीन मुली दि.29 जून रोजी अचानक बेपत्ता झाल्या. नेहमी प्रमाणे शाळेत गेलेल्या मुली शाळा सुटल्यानंतरही घरी आल्याच नाहीत. मुलींच्या पालकांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला पण त्या कुठेच मिळून आल्या नाहीत. अखेर पालकांनी बाजापेठ पोलिस ठाणे गाठून या संदर्भात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी घटनेचे गांभीर्य राखून तात्काळ या संदर्भात गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे फिरवली. याच दरम्यान, रेल्वे स्थानक, स्टेशन परिसर, शाळेच्या आजूबाजूचे सीसीटीव्ही, मोबाईल लोकेशन आणि तांत्रिक माहितीच्या आधारे या मुलींचा शोध सुरू झाला. त्याच दरम्यान या मुली राजस्थानकडे जाणार्या ट्रेनने प्रवास करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार बाजारपेठ पोलिसांनी रेल्वे पोलिसांच्या मदतीने राजस्थानमधील मारवाड रेल्वे स्थानकातून या चारही मुलींना सुरक्षितपणे आपल्या ताब्यात घेतले.
दरम्यान, चारही मुली अजमेर येथे देव दर्शनसाठी जात असल्याची माहिती मिळते आहे. मात्र, तरी देखील विविध अंगांनी या संदर्भाचा अधिक तपास केला. पोलिसांनी अवघ्या दोन दिवसांत या मुलींचा शोध घेऊन त्यांना सुखरुपणे कल्याणला परत आल्याने पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.



Comments