काँग्रेसचा भाजपाला धक्का; राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावरच अनेक नेत्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
- Navnath Yewale
- Mar 16
- 2 min read

काँग्रेसने राज्यातील सत्ताधारी भाजपा, शिवसेना तसेच वंचित बहुजन आघाडीला मोठा धक्का दिला आहे. भाजप आणि शिवसेना इतर पक्षातील नेत्यांना फोडून आपल्या पक्षाची ताकद वाढवत असायचे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्यावेळी तर महाविकास आघाडीच्या पक्षातील स्थानिक पातळीवरील नेत्यांना प्रवेश देत आपल्या पक्षाची ताकद वाढवली.
काँग्रेसने भाजपला आणि शिवसेनेला जबर धक्का दिला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत टिळक भवन येथे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. भाजप, शिवसेना, वंचित बहुजन आघाडी, संभाजी ब्रिगेडसह विविध संघटनांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला. हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांचे काँग्रेस कुटुंबात स्वाकरून पुढील कामासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी काँग्रेसचे सचिव सचिन सांवत, माजी आमदार अनंत गाडगीळ, राजेश शर्मा, एस.सी. विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे , प्रदेश सरचिटणीस धनंजय शिंदे, प्रा. प्रकाश सोनवणे आदीजण उपस्थित होते. काँग्रेस पक्षाचा सर्वसमावेशक विचार आणि राहुल गांधी यांचे अश्वासक नेतृत्व यावरचा विश्वास दिवसेंदिवस वाढत चालला आहे . काँग्रेसचा विचार हाच देशाचा विचार आहे. आज देशातील धर्मांध शक्तींचा मुकाबला फक्त काँग्रेसच करू शकतो म्हणून विविध विचारांचे संघटनेचे लोक काँग्रेस पक्षात प्रवेश करत असल्याचं सपकाळ म्हणाले.
काँग्रेसचा विचवार हा बहुजणांचा, संविधानाचा, देशाचा, साधु संत, महापुरुषांचा विचार आहे. विश्वशांतीचा, विश्वबंधुत्वाचा विचार आहे. हाच विचार आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे तर दुसर्या बाजूला मात्र तोडाफोडा व राज्य करा हा विचार आहे, तो हिंदुत्वाचा विचार नाही तर संधीसाधूचा विचार आहे. एका हातात काँग्रेसचा विचार तर दुसर्या हातात कृती घेऊन संघर्षाची भूमिका घ्या. सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी काम करा, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी केले आहे.
राष्ट्रीय सचिव सचिन सावंत म्हणाले की, भाजपचे खायचे दात व दाखवायचे दात वेगळे आहेत. देशात आज धर्मांध विचाराचे विष पसरवून सामाजिक सलोखा विघडवण्याचे काम केले जातंय. आर्थिक विषमता वाढत चालली आहे. गरिबांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून सरकार मुठभर लोकांसाठी काम करत आहे. काँग्रेस जनतेपासून वेगळी नाही तरी जनतेच्या भावनांशी एकरुप असल्याचंही सावंत यावेळी म्हणाले.



Comments