काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सपकाळ वक्तव्यावर ठाम, चुकीचा शब्द वापरला नाही!
- Navnath Yewale
- May 28
- 1 min read

मुंबई : कांद्याला हामी भावासह शेतकर्यांच्या इतर मागण्यांसाठी महाविकास आघाडीच्या वतिने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी (दि.26) चांदवडमध्ये मोर्चाचे आयोजन करण्यता आले होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीवर अश्लाघ्य भाषेत टीका केल्याने भाजपकडून माफी मागणी करण्यात आली.
शेतकर्यांच्या विविध प्रश्नांसह काद्याला हामी भावाच्या मागणीसाठी आयोजित मोर्चात काल चांदवडमध्ये प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केंद्र, राज्यसरकारवर निशाना साधत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विखारी टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरेंडर तर आहेच पण दलिंदर ही आहे अशा अश्लाघ्य भाषेतील टीकेला भाजपकडून प्रत्युत्तरादाखल मंत्री निलेश राणे यांनी सपकाळ याला स्वत:च्या जिल्ह्यात कोणी विचारत नाही. पंतप्रधान मोदींसह देशाची त्यांनी मागावी अन्यथा जीभ हासडली जाईल असा गर्भित इशाराही त्यांनी दिला.
शिवाय असंविधानिक शब्द मागार घेण्याची इशारा दिला. मंत्री नितेश राणे यांच्या प्रत्यूत्तरानंतर हर्षवर्धन सपकाळ यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी सपकाळ म्हणाले की मी कुठलाही असंविधानिक शब्द वापरला नाही. पंतप्रधान मोदी च्या कार्यकाळापासून महागाई वाढली आहे त्यामुळे मी दलिंदर अशी उपाधी दिली. दलिंदर याशब्दाचा सुधारीत शब्द म्हणजेच पनौती असा होतो. पनौती शब्दाचीही यामध्ये भर घालतो , असे म्हणत सपकाळ यांनी निलेश राणे यांच्या इशारायुक्त टीकेला प्रत्युत्तर दिले.



Comments