top of page

काँग्रेसला मोठा धक्का; संग्राम थोपटे भाजपच्या वाटेवर

Apr 18, 2025
2 min read




राज्याच्या राजकाणात मोठी उलथापालथ होणार असून भोरचे माजी आमदार संग्राम थोपटे काँग्रेसला सोडचिठ्ठी देवून भाजप निवाशी होणार आहेत. दरम्यान, थोपटे यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला असून रविवारी ते पक्ष प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. भाजपचे कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या पुढाकारणे संग्राम थोपटे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.


संग्राम थोेपटे हे काँग्रेसचे मोठे नेते असून ते तीन वेळा आमदार होते. तर त्यांचे वडील अनंतराव थोपटे हे सहा वेळा भोर विधानसभेचे आमदार आहे.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमदेवार शंकर मांडेकर यांनी संग्राम थोपटे यांचा पराभव केला होता. संग्राम थोपटे यांनी आता काँग्रेसला रामराम करुन भाजपमध्ये प्रवेश करण्याचं निश्चित केल्याची माहिती आहे. त्यासाठी त्यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांचीही भेट घेतल्याची चर्चा आहे.


काँग्रेसचा अद्याप राजीनामा नाही

संग्राम थोपटे यांनी अद्याप काँग्रेसचा राजीनामा दिला नाही. ते त्यांच्या कार्यर्क्यांशी चर्चा करत असल्याची माहिती आहे. त्यानंतर रविवारी ते काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा देणार आहेत.

कारखाना अडचणीत असल्याने भाजप प्रवेश?

संग्राम थोपटे अध्यक्ष असलेला राजगड सहकारी साखर कारखाना हा अडचणीत असल्याचे बोलले जात आहे. या कारखान्याला राज्य सरकारने 80 कोटींचे मार्जिन लोन मंजूर केलं होतं. पण लोकसभेत संग्राम थोपटे—— यांनी सुप्रिया सुळे यांना मदत केली आणि सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला. त्यानंतर अजित पवारांच्या विरोधात त्यांच्या कारखान्याला जाहीर करण्यात आलेली मदत मागे घेण्यात आली होती. आता या कारखान्यालया मदत मिळावी यासाठी संग्राम थोपटे भाजपमध्ये जाणार असल्याचे जानकारांचे मत आहे.


पवार कुटुंबीयांसोबत राजकीय वाद

भोरचे थोपटे कुटुंबीय आणि बारामतीचे पवार कुटुंबीय यांचा जुना राजकीय वाद आहे. संग्राम थोपटे यांचे वडील अनंतराव थोपटे हे काँग्रेसचे मातब्बर नेते होते. ते सहा वेळा आमदारही होते. मुख्यमंत्रीपदासाठी त्यांचे नाव जवळपास निश्चित झाले असताना शरद पवारांनी ताकद लावून त्यांचा पराभव केल्याची धारणा आहे. त्यानंतर अनंतराव थोपटे हे राजकारणात मागे पडले.


लोकसभेवेळी 40 वर्षाचं व़ैर संपुष्ठात

लोकसभेला बारामतीमधून सुप्रिया सुळे यांच्या समोर अजित पवारांनी सुनेत्रा पवार यांचे आव्हान निर्माण केल्यानंतर पवारांनी नवी राजकीय समीकरणं जुळवून आणली. त्यामध्ये भोरच्या थोपटे कुटुंबीयांशी 40 वर्षांपासून असलेल्या राजकीय वैराला त्यांनी मुठमाती देत अनंतराव थोपटे यांची भेट घेतली होती. परिनामी सुप्रीया सुळे यांना भोरमधून मोठं मताधिक्य मिळालं आणि त्यांचा विजय सुकर झाला होता.

Comments


bottom of page