कारागृहात वाल्मिक कराडची प्रकृती बिगाडली
- Navnath Yewale
- Jun 22
- 1 min read

मस्साजोगचे सरपंच सतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणी बीडच्या कारागृहात असलेल्या वाल्मिक कराडचा ड्रामा सुरूच आहे. अशातच आता वाल्मिक कराडची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर येत आली आहे.कारागृहामध्येच त्याला मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास जाणवू लागला असून वैद्यकीय पथकाकडून त्याची तपासणी सुरू आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराड आणि त्याचे साथीदार हे बीडच्या कारागृहामध्ये आहेत. सगळ्यांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे. पण कारागृहात असताना वाल्मिक कराडने वारंवार तब्येतीची कारणं पुढे केली जात आहेत. शनिवारी (दि.21) सुद्धा वाल्मिक कराडची कारागृहात प्रकृती बिगाडल्याचं समोर आलं आहे. मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास होत असल्याची माहिती आहे. याची माहिती कारागृह वैद्यकिय पथकास देण्यात आली. त्यानंतर कारागृहामध्ये जाऊन वैद्यकिय पथकाकडून तपासणी करण्यात आली असल्याची माहिती, वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीडच्या विशेष मोक्का कोर्टात सुनावणी घेतली जात आहे. 3 जून रोजी वाल्मिक कराडच्या डिस्चार्ज अॅप्लिकेशनवर युक्तीवाद झाला. वाल्मिक कराडच्या बाजुने निर्णय लागल्यास त्याचा तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा होणार होता. मात्र आता त्याचा हा डाव तुर्तास फसल आहे. वाल्मिक कराडच्या डिस्चार्ज योचिकेवर कोर्टानं महत्वाचं निरीक्षण नोंदवलं. यामुळे वाल्मिकचा तुरुंगातला मुक्काम वाढला आहे. त्याला आणखी बराच काळा तुरुंगात रहावं लागू शकतं.
कराडच्या वकिलाने दाखल केलेल्या डिस्चार्ज अॅप्लिकेशनला सरकारी पक्षाचे वकील उज्वल निकम यांनी जोरदार विरोध केला होता. यावर दोन्ही बाजुने जोरदार युक्तिवाद झाला. दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर कोर्टाने याबाबत महत्वाचा निर्णय घेतला आहे. सरकारी पक्ष आणि आरेापींच्या वकिलाकडून कोर्टात इतरही काही अर्ज दाखल करण्यात आले होते, त्या सर्वांची एकत्रित सुनावणी होणार आहे.
Comments