काश्मीर खोर्यातील 14 दहशतवाद्यांची यादी तयार
- Navnath Yewale
- Apr 26
- 2 min read
सेनादलाच्या कारवाईला सुरवात; दहशवाद्यांच्या घरावर बुलडोझर

पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांकडून 26 जणांची निर्घुणपणे हत्या करण्यात आली आहे. 22 एप्रील रोजी झालेल्या या नसंहारात हिंदू पर्यटकांना लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यानंतर भारताने कठोर पावले उचण्यास सुरवात केली आहे. जम्मू काश्मीरमध्ये दहशवाद्यांना मतद करणार्या आणि अतिरेक्यांवर ठोस कारवाई करण्यात आली आहे. या अतिरेक्यांची घरे बॉम्बने उद्ध्वस्त करण्यात आली आहे. त्यानंतर आता जम्मू काश्मीरमध्ये असलेल्या दहशवाद्यांची यादी तयार असून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
22 एप्रील रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. या हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेण्याचे काम लष्कराकडून सुरू आहे. त्यानंतर आता काश्मीर खोर्यात उपस्थित असलेल्या स्थानिक दहशतवाद्यांची यादी जाहिर करण्यात आली आहे. यामुळे खोर्यात असलेल्या दहशवाद्यांवर लवकरच कारवाई करण्याची शक्यता आहे. या यादीनुसार काश्मीरमध्ये एकूण 14 स्थानिक दहशतवादी सक्रिय आहेत.
पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दल दहशवाद्यांवर एकामागून एक मोठी करवाई करत आहेत. पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांची घरे जमीनदोस्त केली जात आहेत. शनिवारी पुलवामा आणि कुलगाममधील दहशतवाद्यांची घरेही आयईडी स्फोटांनी उद्ध्वस्त करण्यात आली. एका वृत्तानुसार सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर 14 दहशतवादी आहेत, ज्यांच्या नावांची यादी समोर आली आहे. सोपोरमध्ये लष्करचा एक स्थानिक दहशतवादी सक्रिय आहे.
तर अवंतीपुरामध्ये जैशचा एक दहशतवादी आहे. पुलवाममध्ये लष्कर आणि जैशचे प्रत्येकी दोन स्थानिक दहशतवादी आहेत. शोपियानमध्ये एक हिजबुल आणि चार लष्कर दहशतवादी आहेत. तर अनंतनागमध्ये हिजबुलचे दोन स्थानिक दहशतवादी सक्रिय आहेत.
दहशतवाद्याची नावे
आदिल रहमान डेंटू सोपोरमध्ये सक्रिय लष्कर-ए-तोयबा 2021 पासून दहशतवादी कारवायामध्ये सहभागी, आसिफ अहमद शेख अवंतीपुरचा जिल्हा कमांडर जैश-ए-मोहम्मद 2022 पासून दहशतवादी कारवायात सक्रिय , एहसान अहमद शेख -पुलवामामध्ये सक्रिय 2023 पासून दहतवादी कारवायात सक्रिय लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी, हरीश नझीर- पुलवामा येथील दहशतवादी लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी, अमिर नझीर वाणी- पुलवामा येथील दहशतवादी जैश-ए-मोहम्मदशी संबंधित, यावर अहमद भट्ट पुलवामामध्ये सक्रिय जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी, आसिफ अहमद कंडे शोपियां येथील हिजबुल मुजाहिद्दीन चा दहशतवादी 2015 पाकिस्तानी संघटनेत सामील झाला., नशिर अहमद वाणी शोपियानमधील कारवायांमध्ये सहभागी लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी, शाहिद अहमद कुटे शोपियानमध्ये सक्रिय तो लष्कर आणि टीआरएफचा दहशतवादी आहे.,
अमिर अहमद दार शोपियानमध्ये सक्रिय लष्कर-ए- तोयबाचा स्थानिक दहशतवादी, अदनान सफी दार शोपियानमध्ये सक्रिय लष्कर-ए- तोयबाचा दहशतवादी, जुबैर अहमद वाणी अनंतनागामधील हिजबुल मुजाहिद्दीनचा ऑपरेशन कमांडर एक सक्रिय दहशतवादी, हारुण रशीद गनी अनंतनागर येथील हिजबुल मुजाहिद्दीनचा सक्रिय दहशतवादी , झुबेर अहमद गनी हा कुलगामामधील मोठा दहशतवादी आहे. लष्कर- ए- तोयबामध्ये सामिल होऊन तो सतत सुरक्षा दलांवर हल्ल्यांमध्ये सहभागी.
Comments