top of page

किंग कोहलीची तुफान खेळी...




आयपीएल मध्ये विराट कोहलीची बॅट दमदार कामगिरी करत आहे. त्याने स्फोटक शैलित फलंदाजी करून आरसीबी चाहत्यांचे खूप मनोरंजन केले आहे आणि आताही त्याने राजस्थानच्या गोलंदाजांना चिरडून टाकले आहे.



कोहलीने या हंगामातील आयपीएलमधील त्याचे चौथे अर्धशतक झडकावले. फिलिप सॉल्टसोबत फलंदाजीला आलेल्या कोहलीने येताच आक्रमक वृत्ती दाखवली आणि गोलंदाजांवर कहर केला. घरच्या मैदानावर त्याने रॉयल्सच्या सर्व गोलंदाजांना तोंड दिले. कोहलीने साल्टसोबत पहिल्या विकेटसाठी 61 धावांची भागीदारी केली. पण साल्ट 26 धावांवर बाद झाला. तथापी याचा कोहलीवर काही फरक पडला नाही आणि त्याच्या बैटमधून धावा येत राहिल्या.


कोहलीचा धमाका

या हंगामातील पाचवे अर्धशतक त्याच्या बॅटने झडकवण्यात आले.

कोहलीने त्याच्या डावात 8 चौकार मारले आणि 42 चेंडूचा सामना करत 70 धावा केल्या. त्याच्याशिवाय देवदत्त पडिक्कलही गप्प राहिले नाहीत आणि त्यांनी खळबळ उडवून दिली. 27 चेंडूचा सामना करत 50 धावांची खेळी खेळल्यानंतर तो पॅव्हेलियनमध्ये परतला.


कर्णधार ठरला अपयशी

या आयपीएल सामन्यात रजत पाटीदाराच्या बॅटने चांगली कामगिरी केली नसती तरी, तो 1 धावाच्या वैयक्तिक धावसंख्येवर बाद झाला. पण शेवटी टिम डेव्हिड आणि जितेश शर्मा क्रीजवर होते. दोघांनी मिळून काही आकर्षक शॉट्स मारून प्रेक्षकांचे मनोरंजन केेले.


जितेश- डेव्हिडचा शेवट

डेव्हिडने 15 चेंडूत 23 धावांची खेळी केली. जितेश त्याच्या डावात नाबाद परतला. त्याने 10 चेंडूत 20 धावा केल्या आणि आरसीबीला 5 गडी बाद 205 धावांपर्यंत पोहोचवले. राजस्थान रॉयल्सकडून संदीप शर्माने सर्वाधिक 2 बळी घेतले. त्याच्याशिवाय आर्चर आणि हसरंगा दोघांनीही 1-1 विकेट घेतल्या.

Comments


bottom of page