top of page

कोंढवा अत्याचार प्रकरणाचा बनाव

गर्ल आणि कुरिअर बॉय ड्राम; पोलीस तपासात उघड


पुण्यातील उच्चभ्रू असलेल्या कोंढवा परिसरात एका कुरिअर बॉयने इमरातीत घुसून तरुणीवर बलात्कार केल्याचं प्रकरण चांगलंच गाजलं. मुळात पीडित तरुणीने हा सगळा बनाव रचला होता, हे तपासातून समोर आलं. जेव्हा आरोपीला अटक केली तेव्हा बलात्कार प्रकरण कशा प्रकारे रचण्यात आलं होतं, या प्रकरणाची एकएक उकल पोलीसांनी केली. पण तिने हे का केलं, याबद्दल मात्र अद्याप माहिती समोर येऊ शकली नाही. पण तिने ज्या कुरिअर बॉय उल्लेख केला होता तो तिचाच मित्र असल्याचं समोर आलं आहे.


पुणे शहरातील कोंढवा परिसरात उच्चभू्र सोसायटीत राहणार्‍या 22 वर्षीय तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि आपल्यावर बलात्कार झाल्याची तक्रार दिली. या तक्रारीमध्ये तिने 28 ते 30 वर्षीय कुरिअर बॉयने घरात घुसून आपल्यावर अत्याचार केले, अशी माहिती दिली. पुण्यातील कोंढवा सारख्या परिसरात ही घटना घडल्यामुळे पोलीसही अलर्ट झाले आणि तपास सुरू केला.


पोलीसांनी या आरोपीला शोधण्यासाठी 10 पथकं तयार करण्यात आली ठिकठिकाणी, खबर्‍याकडून आरोपीची माहिती गोळा करण्याचं काम सुरू केलं. तब्बल 26 तास हा तपास चालला. या तपासासाठी तब्बल 600 पोलीस कर्मचार्‍यांनी दिवस रात्र एक केली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अखेरीस आरोपीला ताब्यात घेतलं. आरोपीला कोथरूड आणि बाणेर परिसरातून पोलीसांनी अटक केली होती.


दरम्यान पोलीसांनी आरोपीला तब्यात घेतलं आणि पीडितेच्या समोर उभं केलं. जेव्हा या आरोपीचा मोबाईल तपासला तेव्हा तरुणीनेच त्याला मेसेज केल्याचं निष्पन्न झालं. आरोपी हा तरुणीच्या ओळखीचा होता. त्याचं संबंधित प्लॅटमध्ये वारंवार येणं जाणं होतं. पीडितेनं तो कुरिअर डिलिव्हरी बॉय असं सांगितलं होतं, पण तो अँगल खोटा होता. तो तिचाच सॉप्टवेअर इंजिनिअर मित्र होता.


कुरिअर बॉय बलात्कार करून सेल्फी काढून पळून गेला असं तिने सांगितलं होतं. पण पीडितेच्या मोबाईलमध्ये सेल्फी हा एका एपच्या मदतीने काढला होता. आणि त्या फोटोवर तरुणीनेच ‘ मी परत येईन’ असा टेक्स लिहिल्याचं तांत्रिक विश्लेषणात स्पष्ट झालं.


पीडितेचा तो दावा ही खोटाच:

या तरुणीने पालीस तक्रारीत कुरिअर कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यासाठी दरवाजा उघडण्यास भाग पाडलं. बोलण्यात गुंतवून आरोपीने तिच्या चेहर्‍यावर स्प्रे मारला. असं जबाबात सांगितलं होतं. पण हे सगळं खोटं होतं सिनेमाप्रमाणे या तरुणीनेच हा सगळा बनाव केल्याचे उघड झाले. कोंढवा पोलीसांनी पीडितेच्या सोसायटीपासून शहरभरात तब्बल 350 तासांचं फुटेज तपासलं. या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीला कोथरूड आणि बाणेर परिसरातून अटक केली. तपासकाकी तब्बल 600 पोलीस कर्मचार्‍यांनी चोख कामगिरी पार पाडली.

Comments


bottom of page