कोरोना पसरतोय, धोका वाढतोय ; आठवड्यात दहापट वाढ, 48 तासांत 21 मृत्यू
- Navnath Yewale
- Jun 1
- 2 min read

भारतात कोविड -19 च्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे . ताज्या आकडेवारीनुसार, सध्या देशात कोरोनाचे सक्रिय रुग्ण 3000 च्या वर पोहोचले आहेत. केरळ हे देशातील असे राज्य आहे जिथे रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालायाच्या ताज्या आकडेवारीनुसार,25 मे नंतर देशात कोरोनाच्या आकडेवरीत 10 पट वाढ झाली असून 48 तासात 21 जणांचा मृत्यू झाला आहे. केरळव्यतिरिक्त महाराष्ट्र, कर्नाटक आणि दिल्लीतही या विषाणूचे सर्वाधिक रुग्ण आहेत.
आठवडाभराचा विचार केला तर देशभरात कोरोना रुग्ण संख्येत दहापट वाढ झाली. तर मागील नऊ दिवसांत देशात कोरानाच्या रुग्णांमध्ये 1300 टक्के वाढ झाली आहे. सध्या देशात 3783 सक्रिय रुग्ण आहेत. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे बेंगळूरुमध्ये लसीचे तिन्ही डोस घेतलेल्या रुग्णाचाही मृत्यू झाला आहे. त्यामुळे भीतीचे वातावरण आहे. लस घेवून मृत्यू झाल्याची ही पहिलीच घटना आहे. त्यामुळे सर्वांनीच काळजी घेण्याची गरज वर्तवली जात आहे.
दरम्यान, केरळमध्ये सध्या कोरोनाचे सर्वाधिक सक्रिय रुग्ण असून येथे आता 1400 रुग्ण आहेत. रविवारपर्यंत येथे 64 नवीन प्रकरणे नोंदवली गेली होती. यानंतर महाराष्ट्राचा नबंर लागतो. महाराष्ट्रात रविवारपर्यंत सक्रिय रुग्णांची संख्या 485 होती. त्यात 1 जून ला 18 नविन प्रकरणे आली आहेत. तर दिल्लीत रविवार कोविडचे सक्रिय रुग्ण 436 होते ज्यात 1 जून रोजी 61 नविन समोर आले आहेत.
कोणत्या राज्यात किती रुग्ण :
गुजरात 320, कर्नाटक 238, पश्चिम बंगाल 287, तामिळनाडू 199, उत्तरप्रदेश 149, राजस्थान 69, पुड्डुचेर 45,हरियाणा 30, आंध्र प्रदेश 23, मध्यप्रदेश 19, गोवा 10 ओडिशा 9, पंजाब 6, छत्तीसगढ 6, जम्मू काश्मीर 6, झारखंड 6, आसम 5, अरुणाचल प्रदेश 3, सिक्कीम 3, तेलंगणा 3, उत्तराखंड 3, बिहार 2, मिजोरम 2, चंडीगढ 1
आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत कोविडमुळे देशात चार मृत्यू झाले आहेत. दिल्ली, केरळ, कर्नाटक आणि उत्तर प्रदेशमध्ये प्रत्येकी एक मृत्यू झाला आहे. अधिकृत सूत्रांचे म्हणणे आहे की, भारतातील कोरोनाच्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. कोरोनाचा विषाणू प्रभाव तेवढा गंंभीर नाही. शिवाय बहुतेक रुग्ण घरीच उपचार घेत आहेत. त्यामुळे सर्वांना आवाहन करण्यात आले आहे की चिंता करण्याची गरज नाही. कुणीही घाबरुन जावू नये. मात्र सर्वांना काळजी घेण्याची गरज असल्याचेही सांगण्यात येत आहे.
पश्चिम आणि दक्षिणेकडी नमुन्यांच्या जीनोम सिक्केन्सिंगमधून असे दिसून आले आहे की. सध्याच्या कोरोना वाढीस कारणीभूत असलेले व्हेरियंट गंभीर नाहीत. ते ओमिक्रॉनचे सबव्हेरियंट आहेत. ओमिक्रॉनचे चार सबव्हेरियंट एलएफ-7, एक्सएफजी , जेएन.1 आणि एनबी .1.18.1 आढळले आहेत. असं भारतीय अयुविज्ञान अनुसंधान परिषद चे महासंचाल डॉ. राजीव बहल यांनी पटीआयला सांगितलं आहे.
Comments