top of page

कोल्हापुरात तणाव; छत्रपती शिवाजी महराजांचा पुतळा हटवला,शिवप्रेमींकडून टायर जाळून आंदोलन





शिवप्रेमींनी एका चौकात विनापरवाणा बसवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा महसुल आणि पोलिस प्रशासनाने हटवल्याने कोल्हापुरात तणाव निर्माण झाला. शिवप्रेमींनी रस्त्यावर उतरून टायर जाळून आंदोलन केले. इचलकरंजी तालुक्यातील टाकवडे येथे शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला होता. दरम्यान, महसूल आणि पोलिस प्रशासनाच्या बैठकीत तोडगा निघू शकला नाही त्यामुळे प्रशासनाकडून आज छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटविल्याने शिवप्रेमींकडून संताप व्यक्त करत आंदोलन करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार कोल्हापुर जिल्ह्यातील इचलकरंजी शहरालगत असणार्‍या टाकवडे गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा एका चौकामध्ये शिवप्रेमींनी अनधिकृतपणे बसवला होता. यांची माहिती पोलिस प्रशासन, महसूल प्रशासनाला मिळाली. या प्रकरणी शिप्रेमी, पोलिस आणि प्रांत अधिकारी यांची बैठक झाली. यानंतर बैठकीमध्ये कोणताच निर्णय न झाल्यामुळे प्रशासनाने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला.


छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्याने सध्या गावांमध्ये तणावपूर्ण वातावरण आहे. इचलकरंजी टाकवडे गावामध्ये येणारे रस्ते शिवप्रेमींनी बंद केले आहेत. टायर पेटून शासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे. जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा इशारा शिवप्रेमींनी दिला आहे.


छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्यानंतर शिवप्रेमी रस्त्यावर उतरले. शिवप्रेमींनी रस्त्यावर उतरून जाळपोळ केली. आंदोलकांनी रस्ता अडवून टायर जाळले. आंदोलनानंतर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. यावेळी शिवप्रेमींनी सयरकारविरोधात घोषणाबाजी केली. तसेच सरकारचा निषेध नोंदवला.

Comments


bottom of page