क्लिनचिट देणं मुख्यमंत्र्याचं काम नाही - आमदार आव्हाड
- Navnath Yewale
- Nov 2
- 2 min read

फलटणमधील डॉक्टर युवतीच्या आत्महत्या प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज माजी भाजप खासदार रणजितसिंह निंबाळकर आणि राज्य सरकारवर घाणाघाती हल्ला चढवला. त्यांनी या घटनेला “ इंस्टिट्यूशनल मर्डर” म्हणजेच संस्थात्मक खून म्हटलं आहे.
सातरा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येने राज्यभर खळबळ उडाली आहे डॉक्टरच्या सुसाईड नोटमध्ये पोलीस उपनिरिक्षक गोपाल बदने याने चार वेळा लैंगिक अत्याचार केल्याचा आणि प्रशांत बनकर याने मानसिक छळ केल्याचा उल्लेख आहे.
दरम्यान जितेंद्र आव्हाड म्हणाले की, “सरकारी यंत्रणेच्या छळामुळे युवतीचा जीव गेला”
एका मागासवर्गीय उसतोड कामगाराच्या मुलीचा जीव गेला आहे. ही केवळ आत्महत्येचा प्रकार नाही सरकारी यंत्रणेच्या छळवादाचा परिणाम आहे. हा इंस्टिट्यूशनल मर्डर आहे. त्यांनी सांगितले की “ त्या तरुणीच्या सुसाईड नोटमध्ये स्पष्ट शब्दांत लिहिलं आहे की, तिला अन्याय आणि दबावाला सामोरं जावं लागलं. सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष घालायला हवं. पण उलट मुख्यमंत्री क्लिनचीट देत आहेत. धक्कादायक आहे क्लिनचीट देणं मुख्यमंत्र्यांचं काम नाही”
खासदार जर पोस्टमार्टम रिपोर्ट बदलयाला लावत असतील तर तो खूनच आहे.
आव्हाड यांनी थेट रणजितसिंह निंबाळकरांचं नाव घेत गंभीर आरोप केला. म्हणाले की, जर एखादा खासदार डॉक्टरला पोस्टमार्टमचा रिपोर्ट बदलायला सांगत असेल, तर तो आत्महत्येचा नाही खूनाचा प्रकार आहे. आणि तो खून झाला असेल, तर त्या खासदारांचा सहभाग यात असू शकतो याची चौकशी झालीच पाहिजे”
दरम्यान, या प्रकरणाच संदर्भ घेत आव्हाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही लक्ष केलं ते म्हणाले की, “ देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधान पदाचे उमेदवार मानले जात आहेत. मग अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांना सोबत ठेवणे योग्य आहे का? याचा विचार त्यांनी करावा. कारण अशा घटनांनी सरकारचा आणि राज्याच्या प्रतिमेचा अपमान होतो”
खासदार सुप्रीया सुळे उद्या बीडमध्ये: खासदार सुप्रीया सुळे उद्या मयत डॉ. संपदा मुंडे यांच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत. खासदार सुळे यांनी मयत डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्ये प्रकरणी चौकशीची मागणी केली आहे. त्या उद्या मयत डॉ. संपदा मुंडे यांच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत



Comments