‘कॉकरोच’ नंतर आता ‘दिमागी नक्सल पार्टी’ पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यावरुन नवा राजकीय ट्विस्ट; रातोरात लाखो फॉलोअर्स
- Navnath Yewale
- Aug 17
- 1 min read

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘ डिजिटल नक्षल’ हा शब्दप्रयोग केल्यानंतर दुसर्याच दिवशी सोशल याच शब्दप्रयोगावर आधारीत एक उपहासात्मक पक्ष उदयास आला आहे. त्याचे नांव ‘ डिजिटली नक्षल पार्टी’ असे असून या इन्स्टाग्राम पेजला रातोरात 1 लाख 81 फॉलोअर्स मिळाले आहेत.
पक्षाच्या इन्स्टाग्राम खात्यावर आणि त्याच्या बायोमध्ये असे म्हटले आहे की, त्याचे ब्रीदवाक्य “ विचार करा’ संशोधन करा आणि निषेध करा हे आहे. इंस्टाग्राम बायोमध्ये असे म्हटले आहे की, पक्षाचे संस्थापक एक बुद्धिमान भारतीय आहेत. परंतु ते ऑगस्ट 2026 च्या सुमारास तयार केले गेले असावे. सोशल मीडिया पक्षाने सोमवारी अरोप केला की त्यांच्या इंस्टाग्राम खात्यावर सायबर हल्ला झाला आहे.
त्यांनी लिहिले की, इंस्टाग्रामवर सायबर हल्ला झाला, आता बघूया ते आमचा आवाज दाबण्यात यशस्वी होतात की नाही. त्यांनी आपली विचारधाराही मांडली. की ते भगतसिंग यांच्या विचारधारेचे पालन करतात. आम्ही भगतसिंग यांचे अनुयायी आहोत. जर त्यावंनी आमचे खाते निलंबित करण्याचा किंवा आम्हला देशद्रोही म्हणण्याचा प्रयत्न केला, तर हे लक्षात ठेवा की ते भगतसिंग यांचा अपमान करत आहेत.
पंतप्रधान मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाला स्वातंत्र्यदिनानिमित्त संबोधित केल्यानंतर लगेचच ही संपूर्ण घटना घडली. त्यात त्यांनी ज्यांना ते ‘ बौद्धिक नक्षलवादी’ म्हणत होते, त्यांच्याविरुद्ध इशारा दिला त्यांनी सांगितले की, सरकारने सशस्त्र माओवाद्यांविरुरद्ध विजय मिळवला आहे. परंतु या विचारसरणीचे सहानुभतीदार अजूनही तरुणांवर प्रीाव टाकण्यासाठी आणि त्यांचे ब्रेनवॉशिंग करण्यासाठी संधी शोधत आहेत. त्यांनी अशा ‘ बौद्धिक नक्षलवद्यांना’ ओळखून त्यांना एकाकी पाडण्याचे आवाहन केले.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, नक्षलवादी अतिरेकी विचारसरणीने लाखो तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त केले आहे. नक्षलवादी हिंसाचार आणि विचारसरणीने अनेक मतांची मुले हिरावून घेतली आहेत. ते म्हणाले की, या नक्षलवादी हिंसाचाराने अनेक दशकांपासून देशाच्या मोठ्या भागावर बंदुकीच्या जोरावर राज्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्यावर विरोधी पक्षांकडून तीव्र टीका झाली असून काँग्रेस पक्षाने ही नवीन शब्दरचना हताशेचे स्पष्ट लक्षण असल्याचे म्हटले आहे.



Comments