top of page

कॉक्रोच जनता पार्टी नंतर e 20 जनता पार्टीचे सोशल वादळ, सरकारचं टेन्शन वाढणार? सरकारकडे 4 मागण्या

मुंबई: बेरोजगारी आणि पेपरफुटीमुळे देशाचे राजकारण तापलेले असतानाच आता थेट वाहनाच्या फ्युअल टँकवरून नवा लढा उभारला जात आहे.‘ कॉकरोच जनता पार्टी’ च्या वदळी आंदालनानंतर आत ‘e20 जनता पार्टी ’ नावाने एक नवा नागरिक गट उदयास आला आहे. सरकारने अनिवार्य केलेल्या 20 % इथेनॉलमिश्रित (e 20) पेट्रोलऐवजी आम्हाला 100% शुद्ध पेट्रोल निवडण्याचा अधिकार द्या, ही एक ठाम मागणी या गटाने केली आहे. शोसल मीडियावरील या उपरोधक मोहिमेमागे वाहनधारकांना थेट संताप दडलेला आहे.


सध्या देशातील बहुतांश पेट्रोल पंपावर केवळ e 20 फ्युअच उपलब्ध केले जात असल्याने ग्राहकांकडून निवडीचा मूलभूत अधिकार हिरावून घेतला गेल्याची भावना निर्माण झाली आहे. हाच हक्क परत मिळवून देण्यासाठी ही नवीन ‘जनता पार्टी’ मैदानात उतरली आहे.


सोशल मीडियावरील सविस्तर निवेदनानुसार , ‘ e 20 जनता पार्टी’ हे नागरिकांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेले एक ग्राहक हक्क आंदोलन आहे. इंधन धोरणात पारदर्शकता, माहितीच्या आधारे स्वत:चा पर्याय निवडण्याचे स्वातंत्र्य आणि प्रशासकीय जबाबदारी ग्राहकांना मिळायलाच हवी इतर उत्पादनांच्या बाबतीत जेस नागरिकांना हवे ते निवडण्याचे स्वातंत्र्य असते तसेच स्वत:च्या वाहनासाठी कोणते इंधन खरेदी करायचे, याचे स्वातंत्र्य त्यांना मिळाले पाहिजे, अशी मागणी करण्यात आली आहे.


‘ e 29 जनता पार्टी’ च्या मागण्या : पेट्रोल पंपावर ब्लेंडेड इंधनासोबतच 100% शुद्ध पेट्रोल उपलब्ध असावे, जेणेकरून ग्राहकाला स्वत:चा पर्याय निवडता येईल, कोणतेही मोफत भेट, सबसिडी किंवा इथेनॉल-ब्लेंडेड इंधन पूर्णपणे बंद करण्याची मागणी नाही केवळ पर्याय मिळण्याच्या हक्काची मागणी, पेट्रोल पंपावर कोणते इंधन विकले जात आहे, याची स्पष्ट माहिती आणि लेबलिंग असावे, वेगवेगळ्या ब्लेंड्सचा वाहनाच्या मायलेजवर, इंजिनच्या क्षमतेवर आणि देखभालीच्या खर्चावर होणार्‍या परिणामांचा स्वतंत्र अभ्यास करून तो अहवाल सार्वजनिक केला जावा अशा एकून मागण्या करण्यात आल्या आहेत.


दरम्यान, ‘कॉकरोच जनता पार्टी’ प्रमाणचे e 20 जनता पार्टी नेही सोशल मीडियाचा वापर करून जनमत तयार करण्यास सुरुवात केली आहे. सीजेपी ने जंतरमंतरवर केलेल्या यशस्वी आंदोलनानंतर आणि माजी शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर या नवीन डिजिटल हँडलचा जन्म झाला आहे. अभिजीत दिपके यांनी 16 मे रोजी केलेल्या प्रसिद्ध पोस्टचा दाखल देत e 20 जनता पार्टीने म्हटले आहे की, जर देशातील सर्व कार आणि बाईक मालक एकत्र आले तर काय होईल? (जशी दिपके यांनी ‘ सर्व कॉकरोच एकत्र आले तर? अशी पोस्ट केली होती)


जरी e 20 जनता पार्टीची अजून रस्त्यावर थेट आंदोलनाची तयारी किंवा औपचारकि संघटन नसेल, तरीही सीजेपीच्या धर्तीवर मीम आणि उपरोधाच्या माध्यमातून सरकारवर दबाव आणण्याचा हा प्रयत्न मानला जात आहे.

1 एप्रिल 2026 पासून देशभरात e 20 इंधन (20 % इथेनॉल आणि 80 % पेट्रोल) हेच प्राथमिक इंधन म्हणून लागू करण्यात आले आहे. सरकारचा दावा आहे की या निर्णयामुळे कच्च्या तेलाची आयात कमी होईल, ऊस उत्पादक शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढेल, प्रदुषण कमी होईल आणि देशाची ऊर्जा सुरक्षा मजबूत होईल. मात्र, e 20 मुळे वाहनांचे मायलेज 8 ते 15 टक्क्यांनी घटले आहे. जुन्या वाहनांच्या इंजिनचे सुटे भाग खराब हेत असून दुरुस्तीचा खर्च वाढला आहे. तसेच प्युअर पेट्रोलचे भाव प्रीमियम दराने आकारले जात असल्याने सामान्य ग्राहकांच्या खिशाला कात्री लागत आहे.

Comments


bottom of page