खड्ड्यात रस्ता की, रस्त्यात खड्डे; जव्हार शहरातील रस्त्यांची चाळण प्रशासन दूर्लक्ष
- Navnath Yewale
- Jul 28
- 1 min read

मोखाडा; संपूर्ण जव्हार शहरात सध्या पावसामुळे रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असून,रस्त्यांवरील खड्डे इतके मोठे झाले आहेत की, कुठे रस्ता आहे आणि कुठे खड्डा,हे ओळखणे कठीण झाले आहे.काही ठिकाणी तर हे खड्डे तळ्याचे स्वरूप घेत आहेत.त्यामुळे वाहनचालकांपासून पादचाऱ्यांपर्यंत सर्वसामान्य जनतेला मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
शहरातील मुख्य रस्ते,बसस्थानक परिसर, बाजारपेठ,शाळा-कॉलेजच्या रस्त्यांवर पाईपलाईन टाकण्यासाठी व इतर खड्डे मोठमोठाले पडले आहेत.विशेष म्हणजे हे खड्डे केवळ डागडुजीच्या प्रतीक्षेत नाहीत,तर अनेक महिन्यांपासून दुर्लक्षित अवस्थेत आहेत. पावसाळ्यात पाणी साचल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. येथील जनतेला रोजचा प्रवास त्रासदायक बनला आहे. स्थानिक नागरिकांनी यासंदर्भात अनेक वेळा तक्रारी करूनही कोणतेही ठोस पाऊल उचलण्यात आलेले नाही.लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय यंत्रणा याकडे डोळेझाक करत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
पर्यटकांकडून संताप
जव्हार शहर पर्यटनदृष्ट्या महत्वाचे शहर मालनले जाते, शहर परिसरात कायम पर्यटकांची गर्दी असते. मात्र वाहतूकीसाठी अत्यंत महत्वाच्या शहरातील रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. खड्ड्यात रस्ते की, रस्त्यात खड्डे ओळणंही कल्पनेपलिकडचे झाले आहे. वर्दळीच्या आणि वाहतूकीसाठी अत्यंत महत्वाच्या शरातील रस्त्यांच्या दुरावस्थेकडे प्रशासनाने दूर्लक्ष केल्याने पर्यटकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.



Comments