top of page

खासदार संजय राऊतांचे काँग्रेसला खडे बोल

इंडिया आघाडी मातील गाडली गेली का, हवेत विरळली?





महाराष्ट्रात काँग्रेस मित्रपक्षांशी ज्या पद्धतीने वागली त्याचा निकाल विधानसभेत दिसला. आपल्याला मोदी-शहांच्या भाजपला हरवायचे आहे, आपल्याच गोतावळ्यातील मित्रांना नाही’, अशा शब्दात शिवसेनेच (यूबीटी) खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.


अलिकडेच काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन गुजरातमध्ये पार पडले. या अधिवेशनातील मुद्यावर अणि भूमिकांवर बोट ठेवत राऊतांनी काँग्रेसच्या डोळ्यात अंजन घातले. संजय राऊतांनी काँग्रेसच्या अधिवेशनाबद्दल एका लेखातून भाष्य केले आहे. राऊत म्हटले की, काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन मोदी-शाह यांच्या गुजरातमध्ये संपन्न झाले.


अहमदाबादमध्ये काँग्रेसने अधिवेशन घेतले व राष्ट्रीय प्रश्नांवर चर्चा केली याला विशेष महत्व आहे. एरवी विरोधकांचा आवाज दडपण्याची एकही संधी न सोडणार्‍या मोदी-शहांना गुजरातच्या भूमीवरुन त्यांच्यावर झालेले हल्ले सहन करावे लागले, घुसकर मारेंगे हा भाजपवाल्याचा आवडता शब्दप्रयोग आहे. राहुल गांधी यांनी अहमदाबादेत घुसून मारले असेच म्हणावे लागेल.


मोदी-शहांना त्यांच्याच जमिनीवर जाऊन आव्हान देण्याचा हा प्रयत्न चांगला आहे, पण त्यामुळे भारतात खरेच राजकीय क्रांती होईल काय? असा सवाल राऊतांनी काँग्रेसला केला आहे.


विधानसभेतील अपयशाला काँग्रेसही जबाबदार

खासदार राऊत पुढे म्हणाले की, 2024 च्या सर्वात्रिक निवडणूकीत काँग्रेसने शंभर जागा जिंकल्या. इंडिया आघाडीने मोदींना 240 वर रोखले, पण इंडिया आघाडीला सत्ता मिळवता आली नाही. ज्या गुजरातच्या भूमिवरुन काँग्रेसने मोदींना आव्हान दिले, त्या राज्यात काँग्रेस लोकसभेची एकही जागा जिंकू शकली नाही. मध्य प्रदेश, आंध्र प्रदेशातही काँग्रेसला मेहनत घेण्याची गरज आहे. महाराष्ट्रात लोकसभेत यश मिळाले, पण विधानसभेत मोठे अपयश पदरी पडले.


त्यास भाजपचे घोटाळे जितके कारणीभूत आहेत, तेवढेचे काँग्रेसचे अंतर्गत काही विषय जबाबदार आहेत. त्यावर मंथन झाले पाहिजे, असे खडेबोल राऊतांनी काँग्रेसला सुनावले आहेत.


इंडिया आघाडीवरुन सवाल

“ लोकसभेच्या निकालानंतर ‘इंडिया आघाडी कोठे आहे?’ असे प्रश्न विचाले जातात. त्या प्रश्नांना काँग्रेसने गुजरातच्या अधिवेशनातून उत्तर देणे गरजेचे होते. इंडिया आघाडीचे काय झाले? ती जमिनीत गडप झाली की हवेत विरुन गेली? नक्की काय झाले? याचे उत्तर देण्याची जाबाबदारी काँग्रेस अध्यक्षांवर आहे”, असे म्हणत राऊतांनी काँग्रेसला घेरले.


काँग्रेसने स्वत:ला मजबूत करायला हवे, पण भारतीय जनता पक्ष स्वत:ला मजबूत कराताना आपन मित्रपक्षांचा, प्रादेशिक पक्षांचा घास गिळतो. अर्थात आजचे मोदींचे सरकार हे शेवटी प्रादेशिक पक्षांच्या कुबड्यांवरच टिकून आहे.याकडे काँग्रेसने डोळसपणे पाहायला हवे. गुजरातच्या अधिवेशनात काँग्रकसने स्वत: पुरता विचार केला व भूमिकांची मांडणी केली. त्यात ‘इंडिया किंवा ‘भारत’ दिसत नाही. हुकूमशाहीविरुद्ध लढण्यासाठी एकत्र येणे गरजेचे आहे व त्यासाठी काँगसला पुढे यावे लागेल” अशी भूमिका राऊत यांनी मांडली आहे.



तृणमूल वरुन काँग्रेसला सवाल

दिल्लीत केजरीवाल यांच्या पराभवानंतर काँग्रेससाठी मैंदान मोकळे झाले असे त्यांच्या नेत्यांना वाटणे स्वाभाविक आहे. अनेक राज्यात मैंदान मोकळे करण्याचे तंत्र ते अवलंबणार असतील तर मोदी-शाहांची ते सेवा करीत आहेत असेच म्हणायला हवे. बिहार, गुजरात, प.बंगालच्या विधानसभा निवडणूकांत काँग्रेस काय भूमिका घेणार आहे? की पुन्हा एकदा पराभवाचेच दिलखुलास स्वागत करणार? असा सवाल राऊतांनी केला.


रनशिंग फुंकले पुढे काय?

महाराष्ट्रात काँग्रेस मित्रपक्षांशी ज्या पद्धतीने वागली त्याचा निकाल विधानसभेत दिसला. आपल्याला मोदी-शहांच्या भाजपला हरवायचे आहे, आपल्याच गोतावळ्यातील मित्रांना नाही. काँग्रेसने आपल्या जुन्या वाड्याचे नेपथ्य लावून भाषणे केली. वाडा लयास गेला आहे. तो उभारण्याची ताकद निर्माण करावी लागेल. जुन्या काळातून बाहेर पडून नवा विचार द्यावा लागेल. गुजरातच्या भूमीवरुन काँग्रेसने रणशिंग फुंकले, पण पुढे काय? असे म्हणत संजय राऊतांनी काँग्रेसच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले आहे.

Comments


bottom of page