top of page

खासदार सुप्रिया सुळेंचा मोठा निर्णय; तेरावा होईपर्यंत माध्यमांसमोर प्रतिक्रिया देणार नाही !


बारामती : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 28 जानेवारी रोजी विमान दुर्घटनामध्ये दुर्दैव मृत्यू झाला. या घटनेनंतर संपूर्ण पवार कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. पवार कुटुंबियाने दुखवटा पाळला आहे. या दरम्यान आनेक राजकीय घडामोडी घडत आहे. रोहित पवार यांनी देखील सगळ्यावर मौन बाळगलं आहे. तसेच खासदार सुप्रिया सुळे या वेगळ्या पद्धतीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. सुप्रीया सुळे दररोज अजित पवारांसोबतचा फोटो आपल्या स्टेटसला ठेवला असून आपलं दु:ख व्यक्त करत आहेत. अशातच सुप्रिया सुळे यांनी मोठा निर्णय घेतला आहे.


दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार झालेला विमान अपघात हा अतिशय दुर्दैवी होता. खासदार सुप्रिया सुळे यांना खूप मोठा धक्का बसला आहे. जोपर्यंत अजित पवार यांना जाऊन तेरा दिवस होत नाहीत तोपर्यंत प्रसिद्धी माध्यमांना मी कुठल्याही प्रकारच्या प्रतिक्रिया देणार नाही. तेरा दिवस झाल्यानंतर मी प्रसिद्धी माध्यमांशी बोलेन असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितलं आहे.


राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) अजित पवार यांच्या विमान अपघाताचा तपास वेगाने सुरू केला आहे. या तपासाचा भाग म्हणून शुक्रवारी सीआयडीने अजित पवारांचे खासगी सचिव अविनाश सोलवट यांची मंत्रालयात सुमारे 4 तास सखोल चौकशी केली. यात 28 जानेवारीच्या बारामती दौर्‍याचे नियोजन, प्रवासाचे तपशील आणि शेवटच्या क्षणी झालेले बदल यावर माहिती घेण्यात आली.


अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पदावर सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्राच्या पहिल्या महिल्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. त्यांनी प्रशासकीय आणि राजकीय सूत्रे हातात घेतली असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधीमंडळ नेतेपदीही त्यांची निवड करण्यात आली आहे. राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी 7 फेब्रूवारी 2026 रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. अजित पवार यांच्या निधनामुळे निर्माण झालेल्या शोककळेमुळे सर्वच पक्षांनी प्रचाराचा जोर कमी ठेवली होता.


लोकांचे अभार: मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मतदारांचे आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले. त्यांनी आपल्या कुटंबासह बारामतीमध्ये मतदानाचा हक्क बजावली. विमान अपघाताच्या तांत्रिक तपासासाठी ‘ब्लॅक बॉक्स’ दिल्लीला पाठवण्यात आला असून, खराब हवामान किंवा तांत्रिक बिघाड यासह सर्व शक्तांची चौकशी सुरू आहे.

अपघातानंतर दुसर्‍याच दिवशी म्हणजे 29 जानेवारीला बारामतीतील विद्या प्रतिष्ठान मैदानावर अजित पवार यांचा अंत्यसंस्कार पूर्ण राजकीय सन्मानाने करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने नेते, कार्यकर्ते आणि सामान्य लोक उपस्थित होते. अंत्यसंस्कारानंतर 30 जानेवारीला करहा आणि नीरा नद्यांच्या संगमावर सोंगाव येथे अस्थी विसर्जन करण्यात आले. या वेळी कुटुंबीयांनी प्रगतिशील दृष्टिकोन ठेवून सर्व आवश्यक धार्मिक विधी तीन दिवसांत उरकले. यामुळे पारंपारिक रूढीना वेगळा वळसा देण्यात आल्याचे दिसून आले.


पवार कुटुंबाने दशक्रिया आणि तेरावा हे विधी न करण्याचा निर्णय घेतला आहे. अजित पवारांचे कोणतेही पुढील विधी होणार नाहीत, असे श्रीनिवास पवार यांनी स्पष्टपणे सांगितले. अस्थि वित्सर्जनाच्या वेळीच सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या आहेत. कुटुंबीयांनी या विधी घरीच खासगी पद्धतीने करणार असल्याचे सांगितले. यामुळे लोकांना या विधींमध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार नाही.

Comments


bottom of page