खोक्या उर्फ सतिष भोसलेचा जामिनअर्ज न्यायालयाने फेटाळला
- Navnath Yewale
- Apr 30
- 1 min read

ढाकणे पिता-पुत्रांना मारहाण व वनविभागाच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीमध्ये असलेल्या आरोपी खोक्या उर्फ सतिष भोसलेच्या विरोधात शिरुर कासार (जि.बीड) पोलिस ठाण्यात वेगवेगळ्या स्वरुपाचे पाच गुन्हे दाखल आहेत. यापैेकी दोन गुन्ह्यामध्ये खोक्या उर्फ सतिष भोसले न्यायालयीन कोठडीत आहे. खोक्या भोसलेने बीड न्यायालयात जामीनसाठी अर्ज केला होता. मात्र बीड न्यायालयाने त्याचा जामिन अर्ज फेटाळला आहे.
शिरुर कासार तालुक्यातील ढाकणे पिता-पुत्रांना अमाणुष मारहाण आणि वनविभागाच्या धाडीमध्ये त्याच्या घरात वेगवेगळ्या प्रकारचे सापडलेले साहित्य. या प्रकरणांमध्ये त्याने बीडच्या न्यायालयात धाव घेतली होती. बीड न्यायालयाने मात्र त्याचा जामीन अर्ज नाकारला आहे. आपल्याला जामीन मिळावा असा अर्ज त्याचे वकिल शशिकांत सावंत यांच्या माध्यमातून करण्यात आला होता. मात्र दोन्ही अर्जावरती न्यायालयाने आदेश देत ते फेटाळले आहेत.
बीडच्या न्यायालयाने जामिन अर्ज फेटाळल्याने खोक्या उर्फ सतिष भोसले याच्या अडचणीत वाढ झाली आहे. वनविभागाच्या गुन्ह्यातही खोक्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्यातच आता बीडच्या मा. न्यायालयाने त्याचा जामिन अर्ज फेटाळल्याने त्यास खोक्या भोसले उच्च न्यायालयात धाव घेतोय का? हे पहावे लागणार आहे. दरम्यान खोक्या भोसलेच्या आडचणी वाढत असल्याचे दिसून येत आहे.
Comments