top of page

खोक्या भोसलेला मारहाण झालीच नाही

वनविभागाने खोक्याच्या वकिलाचे दावे फेटाळले

गेल्या काही महिन्यांपासून बीड जिल्हा अनेक कारणांमुळे सतत चर्चेत आहे. आता सतिष (खोक्या) भोसलेेच्या कारनांमुळे पुन्हा जिल्ह्याची चर्चा होत आहे. सतिष उर्फ खोक्या भोसलेने आपल्याला वन विभागाच्या अधिकार्‍यांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप केला आहे. मात्र, खोक्याला मारहाणीचे आरोप फेटाळून लावले आहेत.


वन्य प्राण्यांची शिकार केल्या प्रकरणी सध्या सतिष उर्फ खोक्या भोसले कोठडीत आहे. मात्र कोठडीत खोक्याला मारहाण झाल्याचा दावा खोक्याचे वकिल अंकुश कांबळे यांनी केला आहे. सतिष भोसलेला वन विभागाच्या अधिकार्‍यांनी सीसीटीव्ही कॅमेरे बंद करुन बेदम मारहाण केली, तसंच नक्षलवादी घोषीत करण्याची धमकी दिल्याचा आरोपही खोक्याच्या वकिलांनी केला आहे.


खोक्याच्या वकिलांकडून कोठडीत खोक्याला जबर मारहाणीचा आरोप करण्यात येत असला तरी आता वन विभागाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे खोक्याला कसल्याही प्रकारची मारहाण अथवा थर्ड डिग्रीचा अवलंब केला नसल्याचे प्रसिद्धी पत्राद्वारे जाहिर केले आहे.

बीड कारागृहातून सतिष उर्फ खोक्या भोसले याला कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन नेण्यात आलं. त्यानंतर त्याची वैंद्यकिय तपासणी करुण कायद्यानुसार चौंकशी केली.


खोक्याला वन विभागाच्या ताब्यात असताना मारहाण झाली नाही. त्याच्या अंगावर कोणत्याही नवीन जखमेचे व्रण नाहीत असा अहवाल वैंद्यकिय अधिकार्‍यांनी दिला होता. त्यानुसार मारहाण न केल्याचं सिद्ध होत आहे. खोक्याला मारहाण झाल्याच्या बातम्यांचे वन विभागाकडून खंडन करण्यात आलं आहे.


खोक्याच्या या मारहाणीच्या प्रकरणावर राष्ट्रवादीचे नेत छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जामीन किंवा इतर गोष्टींसाठी असे दावे केले जात असल्याचं भुजबळ म्हणाले.

आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतिष उर्फ खोक्या भोसले सध्या कोठडीत आहे. त्याची जामीनासाठी धडपड सुरु आहे. त्यामुळे त्याच्या वकिलांनी वन विभागावर असे मारहणीचे आरोपक केले आहेत का? असा सवाल वन विभागाच्या स्पष्टीकरणांने उपस्थित होत आहे.

Comments


bottom of page