गाडीवर भारत सरकार, भाजपचा झेंडा अन् गुटख्यची तस्करी तलासरी पोलिसांची कारवाई, 20 लाखांचा माल पकडला; तिघांना अटक
- Navnath Yewale
- Jul 18
- 2 min read

पालघर : गाडीवर‘ भारत सरकार’ अशी पाटी आणि भाजपचा झेंडा लावून गुटख्याची तस्करी होत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. तलासरीच्या पोलिसांनी सापळा रचून त्याचा भांडाफोड केला असून याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. या तस्करीत एका अल्पवयीन मुलाचादेखील समावेश आहे. गुजरातहून तलासरीमार्गे हा गुटखा महाराष्ट्रात आणला जात होता . पोलिसांनी 20 लाख रुपयांचा गुटखा ताब्यात घेतला असून व्हॅगनर व इनोव्हादेखील जप्त केली आहे. गुटख्याच्या या तस्करीमागे मोठे रॅकेट असल्याचा संशय असून पोलीस त्यादृष्टीने तपास करीत आहेत.
गुजरातमधून महाराष्ट्रात चरस, गांजा, एमडी पावडर, दारू, गुटखा याची तस्करी मोठ्या प्रमाणावर नेहमी होते. पण आता हद्द झाली असून या तस्करीसाठी चक्क सत्ताधारी भाजपचे चिन्ह, झेंडा आणि ‘ भारत सरकार’ नावाची पाटी याचादेखील सर्रासपणे वापर केला जात असल्याचे दिसून आले आहे. गुजरातमधून महराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर गुटखा देान गाड्यांमधून आज पहाटेच्या सुमारास येणार असल्याच माहिती तलासरीच्या पोलिसांना मिळाली होती. त्याच्या आधारे महामार्गावरील तलासरीच्या हद्दीत सापळा लावला.
संशयास्पद व्हॅगनर कार आणि चंदेरी रंंगाची इनोव्हा कार दिसताच पोलिसांनी ती थांबवली. तसचे या दोन्ही गाड्यांची झडती घेतली असता आतमध्ये गोण्यात लपलेल्या सुगंधी गुटख्याच्या गोणी अढळून आल्या. त्या सर्व ताब्यात घेतल्या आहेत. एका कारच्या पुएील बाजूस ‘ भारज सरकार’ अशी पाटी लावली होती. तर मागच्या बाजूस भाजपचा झेंडा आणि कमळदेखील दिसत होते. या तस्करीप्रकरणी तलासरी पोलीसांनी यशवंत सिंह सलीम शाह, अफताब अन्सारी यांना अटक केली आहे. त्यांच्यासोबत एक अल्पवयीन मुलगा देखील होता. या सर्वांवर आता काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या दोन्ही गाड्या नेमक्या कोणाच्या मालकीच्या आहेत हे अजूनही गुलदस्त्यात आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक विनायक नराळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिी अधिकारी निशा जाधव, पोलिस निरिक्षक प्रदिप पाटील, प्रभारी अधिकारी अजय गोरड, विकास दरगुडे, जयराम उमतोल, राहुल क्षत्रिय, विशाल लोहार, अनिल सोनवणे, रामचंद्र गवळी यांनी केली.



Comments