top of page

गरीब ओबीसी तुम्हाला सतरंज्या उचलायला लावणार! एल्गार सभेतून भुजबळांचा भाजपाला इशारा

ree

बीड: अखिल भारतीय महात्माफुले समता परिषदेच्या वतिने आज बीडमध्ये ओबीसी एल्गार सभेचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील छत्रपती संभाजी महाराज मैदानामध्ये आयोजत एल्गार सभेस आमदार धनंजय मुंडे, भाजप आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार प्रकाश शेंडगे, लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे, राजाराम पाटील, मनोहर धोंडे आदी मान्यवर उपस्थित होते.


ओबीसी आरक्षण बचाव एल्गार सभेस सायंकाळी 5:00 दरम्यान सुरुवात झाली. जिल्ह्याच्या कानाकोपर्‍यातून हजारो ओबीसी बांधव सभेस उपस्थित होते. मंत्री छगन भुजबळ यांनी जरांगे पाटील यांच्यासह महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर सडकून टीका केली. तत्पुर्वी आमदार धनंजय मुंडे यांनी जरांगे पाटील यांनी माझं आणि भुजबळ साहेबांच सगळंच काढलं, आमच्या घरा-दारापर्यंत पोहोचला. आता कायत आमचा चष्मा काढला, आवडला असला तर घेवून जा, पण ओपल (शोभेल) का? असा उपरोधक टोला लगावत मराठा समाजास वेगळं आरक्षणाच्या बाबतीत आम्ही सोबत आहोत पण ओबीसीतून नाही. आमच्या ताटातलं जर कोणी घेत असेल तर आम्ही गप्प बसणार नाहीत असे म्हणत जरांगे पाटील यांना इशारा दिला. आमदार गोपिचंद पडळकर म्हणाले की, जीआर जरी निघाला असला तरी अद्याप पर्यंत एकही प्रमाणपत्र वाटप झालेलं नाही, त्यामुळे तुम्ही ते प्रमाणपत्र वगैरे सोडा त्यासाठी आमचे मार्गदर्शक छगन भुजबळ समर्थ आहेत.



मंत्री छगन भुजबळ यांनी जरांगे पाटील यांच्यावर सडकून टीका केली. मराठा आणि ओबीसीमध्ये अंतर पडला असं म्हणतात, होय पडलाय पण तो आंतरवालीच्या.... ने पाडला आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे तर आम्ही पाहूण घेवू, प्रसंगी त्यांना सोडणार तर नाहीच. मी मुख्यमंत्र्यांना बोललो सावधान यांचं टारगेट ओबीसी नाही. देवेंद्र फडणवीस आहे. ओबीसींच्या ताकदीवर 135 आमदार निवडणून आलेत, ओबीसी काही दुधखुळे नाहीत. आम्ही इथे पक्षाचं काम करत नाहीत, ओबीसींच काम करतो. पक्षबाजूला सारून आम्ही ओबीसींच्या हितासाठी आलो आहोत. मुंबईत आणखी एक रात्र थांबायला पाहिजे होतं, पोलिसांनी रस्ते तर मोकळे केलेच होते. मुंबईत आलेले मराठे नव्हते, ज्या जरांगे सोबत असलेले दारू वाले, वाळू वाले लोक होते. यावेळी भुजबळ यांनी सोबतचे कुणबी प्रमाणपत्र दाखवत आम्हाला प्रमाणपत्र घ्यायला दहा महिणे लागतात आणि यांना ज्या दिवशी अर्ज करता त्याच दिवशी प्रमाणपत्र मिळते, अधिकारी एवढे जलद कधी झाले. हे मी मुख्यमंत्री फडणवीस आणि महसुल मंत्री बावनकुळे यांना दाखवले.


वडेट्टीवारांची डबल ढोलकी.....

छगन भुजबळ यांनी सभेस संबोधीत करताना जूना व्हिडीओ दाखवत वडेट्टीवार यांची दुटप्पी भुमिकाच समोर मांडली. आंबडच्या सभेत ओबीसींसोबत असल्याचे सांगितले आणि आंतरवालीत जरांगे च्या आंदोलनस्थळावरून मराठवाड्यातील मराठ्यांना नोंदीप्रमाणे कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्याचे सांगता असे म्हणत छगन भुजबळ यांनी वडेट्टीवारांची एकप्रकारी डबल ढोलकीच वाजवली.

Comments


bottom of page