गोळीबार प्रकरण: खान सरांचे कोचिंग सेंटर बंद होणार? शस्त्रबंदी कायद्यातंर्गत कारवाई आता कोचिंगे इन्स्टिट्यूट अडचणीत?
- Navnath Yewale
- Jun 7
- 2 min read

पटणा: बिहारमधील पटणाचे प्रसिद्ध शिक्षक आणि खान ग्लोबल स्टडीज (केजीएस) चे संचालक, फैसल खान, जे खान सर म्हणूनही ओळखले जातात, त्यांच्या अडचणीत वाढ होत आहे. गोळीबार आणि तोडफोड प्रकरणात आधीच कायदेशीर आव्हानांना तोंड देत असलेल्या फैसल खान यांना आता अग्निसुरक्षा अनियमांसंदर्भात मोठा धक्का बसला आहे.
बिहार अग्निशमन सेवेने केलेल्या तपासणीत त्यांच्या कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये सुरक्षेच्या अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत. अधिकार्यांनी तात्काळ सुधारणा करण्याचे आदेश दिले असून, जर या त्रुटी विहित वेळेत दूर केल्या नाहीत, तर कोचिंग सेंटरवर कायदेशीर होऊ शकते, ज्यात संस्था सील करण्याचाही समावेश आहे, असा इशारा दिला आहे. दरम्यान, गाळीबार प्रकरणात खान सर सोमवारी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल करण्याची जयारी सुरू आहे.
बिहार आग्निशमन सेवेचे डीआयजी मानोज कुमार नट यांनी सांगितले की, खान ग्लोबल स्टडीजच्या तपासणीदरम्यान अग्निसुरक्षेच्या अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत. तपासणीनंतर, संस्थेच्या व्यवस्थेच्या व्यवस्थापनाला आवश्यक सुधारणा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अधिकार्यांचे म्हणणे आहे की, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी अग्निसुरक्षा नियमांचे पालन करणे आवश्यक आहे आणि कोणताही हलगर्जीपणा खपवून घेतला जणार नाही.
डीआयजी मनोज कुमार नट यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, जर सर्व त्रुटी विहित मुदतीत दूर केल्या नाहीत, तर जिल्हा अग्निशमन अधिकारी संस्थेवर कठोर कारवाई करू शकतात. यामध्ये कोचिंग सेंटर सील करण्याचा समावेश असू शकतो. तपास पुढे सरकल्यावर पोलिसांना समाजले की, गोळीबार बाहेरच्या व्यक्तींनी नाही, तर खान ग्लोबल स्टडीजच्या सुरक्षारक्षकांनी केला होता. यानंतर पोलिसांनी संस्थेतील दोन सुरक्षारक्षकांना अटक केली. चौकशीदरम्यान, सुरक्षारक्षकांनी दावा केला की त्यांनी खान सरांच्या सांगण्यावरुन गोळीबार केला होता. सुरक्षारक्षकांच्या जबाबावरुन पोलिसांनी फैसल खानवर शस्त्र कायदा आणि इतर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, खान सरांचे वकील अरविंद कुमार महूआर यांनी सांगितले की त्यांचे पक्षकार दिवानी न्यायालयात आत्मसर्मण करणार नाहीत. ते पुढे म्हणाले की, अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत शनिवारी संपली आहे, त्यामुळे अर्ज सोमवारी दाखल केला जाईल. वकीलांच्या म्हणण्यानुसार खान सर कायदेशीर प्रक्रियेद्वारे अटपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज करतील.



Comments