घरातच अढळले गद्दार, पैशासाठी गद्दारी; पाकिस्तानला माहिती पुरवणार्या दोघांना अटक
- Navnath Yewale
- May 12
- 1 min read

भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी दोन देशद्रोह्यांना अटक केली आहे. हे दोघे देशद्रोही दिल्लीस्थित पाकिस्तान उच्चायुक्तालयातील अधिकार्यांसाठी काम करत होते. अधिकार्यांना माहिती गोळा करून पाठवत होते. पोलिसांनी दोन्ही आरोपींना मालेरकोटला येथे अटक केली. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.
पंजाब पोलिस महासंचालक गौरव यादव यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवरून ही महिती अधिकृतपणे शेअर केली. डीजीपी म्हणाले की, एक आरोपी भारतीय सैन्याच्या हालचालींबाबतची गोपनीय माहिती पाकिस्तानातील त्याच्या हँडलरकडे पाठवत होता. चौकशीत त्याने आपल्या दुसर्या साथीदाराचं नाव उघड केलं, आणि त्यानंतर पोलिसांनी दुसर्या व्यक्तलाही अटक केली.
पोलिसांच्या प्राथमिक माहितनुसार, या प्रकरणाशी सबंधित आरेापी पैशांच्या मोबदल्यात देश आणि सैन्याशी संबंधीत माहिती पाकिस्तानला पुरवत होते. त्यांना पैसे ऑनलाईनच्या माध्यमातून देण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. हे दोघंही त्यांच्या पाकिस्तानस्थित संपर्कात नियमित संवादात होते आणि त्यांच्या सूचनांनुसार काम करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
आरोपींना मिळालेल्या पैशांचा काही भाग इतर व्यक्तींनाही दिला जात होता. पोलिसांनी त्यांच्याकडून दोन मोबईल फोन जप्त केले आहेत. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच दोघांविरोधात गुन्हा दखल केला असून, या प्रकरणाचा गांभीर्याने तपास सुरू आहे.
डीजीपी गौरव यादव म्हणाले की, ही कारवाई सीमेपलीकडून सुरू असलेल्या हेरगिरी कारवायांच्या विरोधात आहे. आरोपींच्या चौकशीतून त्यांच्या आर्थिक व्यवहरांचे तपशील समोर येत असून, अजून किती लोक या नेटवर्कचा भाग आहेत हे शोधण्याचे काम सुरू आहे. लवकरच या प्रकरणाच्या मुळाशी पोहोचू आणि यातील सर्व अरोपींना अटक करू असेही डीजीपी यादव म्हणाले.
Comments