top of page

चार महिण्यात एक हजार शेतकर्‍यांच्या आत्महत्या! विविध नैसर्गिक आपत्तीमुळे 54 हजार 533 हेक्टर क्षेत्र बाधीत



दुष्काळ, अवकाळी, गारपीट, आसमानी तर कधी सुलतानी संटकाने पिचलेला शेतकरी कायम सततच्या नापिकीला तोंड देत आहे. शेती उत्पादनाची घट यासह इतर समस्यांच्या नैराश्येतून अवघ्या चार महिण्यात राज्यात 1000 हजार शेतकर्‍यांनी आपली जिवनयात्र संपवली आहे. शिवाय आपत्तीमुळे 54 हजार 533 हेक्टर क्षेत्र बाधीत झाल्याची माहिती विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते आंबदास दानवे यांनी दिली आहे.

राज्यात शेतकरी आत्महत्याचं सत्र थांबता थांबत नाही. सिंचनाचा अभाव, शेती मालाला हमी भाव नाही, त्यातच सततच्या नापिकीमुळे शेतकर्‍यांचे आर्थीक गणित कोलमडले आहे. मुलाबाळांचं शिक्षण, लेकीबळांचे हात पिवळे करण्याचं गणित शेती उत्पादनावर अवलंबून आहे. पेरणी नंतर पावसाचा खंड त्यामुळे उत्पादनात निम्याहून अधिक घट त्यामुळे शेतकर्‍यांनी दरवर्षी ठरवलेल्या नियोजनावर पाणी फिरते.


उत्पानाच्या घटीमुळे मुलांबाळांच्या उच्च शिक्षणासाठी सावकाराचे उंबरे झिजवावे लागतात. पिकवलेल्या मालाला हमीभावा अभावी कवडीमोल बाजाराभाव मिळतो. उत्पदान खर्चाचीच बरोबरी होत नसल्याने आर्थीक संकटाला तोंंड द्यावी लागते. त्यातच शासनस्तरावरुन ठोस उपाय योजनांचा कायम अभाव. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शेती मालाला हमी भाव, सिंचनाक्षेत्र वाढीसाठी शाश्वत उपाय योजना, शेतकर्‍यांच्या उन्नतीसाठी निर्णायक धोरण राबविणे गरजेचे आहे. शासनाच्या कृषी विभागामार्फत मिळणार्‍या योजनां जाचक अटींमुळे शेतकर्‍यांच्या हिताच्या ठरताना दिसत नाहीत.


हंगामी योजना तर शेतकर्‍यांपर्यंत पोहोचतच नाहीत ही बाब वेगळीच. पण अनुदानाच्या योजनांसाठी सरकार दरबारी उंबरे झिजवावे लागतात, त्यामुळे सामान्य शेतकरी ‘नको रे बाबा’ याच भुमिकेत कामय आहे. हंगामी योजनांच्या माध्यमातून शेतकर्‍यांना सवलतीच्या दरात खत बियाणांसाठी मर्यादा लादल्या आहेत. तांत्रिक शेतीच्या ओघात उत्पादनाच्या तुलनेत मशागीतीचा खर्च दुप्पट होत असल्याने शेतकरी कायम कर्जाच्या बोजाखाली दबत चालला आहे. जगाच्या पोषिंद्यावरच कर्जाचा डोंगर वाढत असल्याने शेती उत्पादनाची घट शेतकर्‍यांच्या मुळावर उठली आहे.


जानेवरी ते एप्रील या चार महिन्याच्या कालावधीत राज्यभरात तब्बल 1000 हजार शेतकर्‍यांनी आपली जिवन यात्रा संपविल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शिवाय विविध नैसर्गिक आपत्तीमुळे 54 हजार 533 हेक्टर क्षेत्र बाधीत झाले आहे. या क्षेत्रातील सर्व शेती पिके उद्ध्वस्त झाली असून शेतकर्‍यांवर उपासमारीचा बाका प्रसंग ओढावला आहे. आधिच कर्जबाजारी त्यात शेती उत्पदान नाही अशा दुहेरी संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांना नुकसान भरपाईसाठी सरकारने तात्काळ पंचनामे करून विना अट तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आंबदास दानवे यांनी केली आहे.

Comments


bottom of page