चित्रपट दाखवण्याच्या बहाण्याने एमबीबीएस विद्यार्थीनीवर सामूहिक अत्याचार
- Navnath Yewale
- May 25
- 1 min read

राज्यातील सांगली येथून सामूहिक अत्याचाराची ह्रदयद्रावक घटना समोर आली आहे. सांगली मोडिकल कॉलेजमधील एका एमबीबीएस विद्यार्थीणीला रसात शामक औषधे मिसळून तिच्या मैत्रिणींच्या क्रूरतेचा बळी बनवण्यात आले. विद्यार्थीनीच्या प्रतिष्ठेला कलंक लावणार्यांपैकी दोघे तिचे वर्गमित्र होते. पिडीतेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी तिच्या दोन मैत्रिणी आणि त्यांच्या एका साथीदाराविरुद्ध सामूहिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.
पोलिसांच्या अहवालानुसार ही (18 मे 2025 ) ची घटना आहे आणि विद्यार्थीणीने गेल्या मंगळवारी पोलिस ठाण्यात तक्रार केली होती. शुक्रवारी पोलिसांनी उघड केले की, तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे आणि न्यायालयाच्या आदेशानंतर, तिन्ही तरुणांना 27 मे पर्यंत पोलिस कोठउी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले की, ही घटना महाराष्ट्रातील सांगली येथील एका अपार्टमेंटमध्ये घडली. जे एका आरोपीने भाड्याने घेतले होते. या तिघांनी विद्यार्थीणीला काही कामाच्या बहाण्याने नेले आणि तिला मादक पदार्थ मिसळलेले पेय पाजले आणि नंतर तिच्यावर अत्याचार केला.
विद्यार्थीणीवर अत्याचार करणार्या तीन आरोपीपैकी दोघे पुणे आणि सोलापूरचे रहिवासी आहेत आणि विद्यार्थीणीचे वर्गमित्र होते. तिसरा आरोपी सांगलीचा आहे जो त्याचा मित्र आहे. या तिघांचे वय 20ते 22 वर्षाच्या दरम्यान आहे. पोलिसांच्या अहवालानुसार एमबीबीएस विद्यार्थीणीला तिच्या मैत्रिणींनी चित्रपट दाखवण्याच्या बहाण्याने पळवून नेले होते.
परंतु ते प्रथम तिला आपार्टमेंटमध्ये काही कामाच्या बहाण्याने तिथे घेऊन गेले. इथेच तिघांनीही दारु प्यायली आणि तिच्या पेयामध्ये काही ड्रग्ज मिसळले आणि नंतर, तिच्यावर सामूहिक अत्याचार केला.
दरम्यान, पिडीत विद्यार्थीणी कर्नाटकातील बेळगावची रहिवासी आहे आणि महाराष्ट्रातील सांगली मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसच्या तिसर्या वर्षात आहे. पिडितेने तिच्या तक्रारीत पोलिसांना सांगितले की, तिघांनीही तिला धमकी दिली होती की, जर तिने हे कोणाला सांगितले, तर त्याचे परिणाम भयानक होतील. धमक्या असूनही,तिने धाडस करून तिच्या पालकांना घटनेबद्दल सांगितले, त्यानंतर तिने विश्रामबाग पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
Comments