top of page

छगन भुजबळ कम बॅक ,आज राजभवनात मंत्रीपदाची शपथ घेणार !




महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातील मोठी घडामोड होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) ज्येष्ठ नेत छगन भुजबळ आज मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. राजभवनात सकाळी 10:00 वाजता 50 जणांच्या उपस्थितीत भुजबळ यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे.


संतोष देशमुख यांच्या हत्ये नंतर राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. दरम्यान, धनंजय मुंडे यांच्याकडे असलेल्या खात्याची जबाबदारी आता छगन भुजबळ यांना दिली जाणार असल्याची माहिती आहे. छगन भुजबळ सरकारच्या मंत्रीमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज होते. याबाबतची खंत त्यांनी वारंवार बोलून दाखवली होती. छगन भुजबळ यांनी जाहिर कार्यक्रमातून नाराजी व्यक्त केली होती. मात्र, आता अखेर छगन भुजबळांची पुन्हा एकदा मंत्रीपदी वर्णी लागल्याने भुजबळांची नाराजी दूर झाली आहे. तसेच भुजबळांची मंत्रिपदी वर्णी लागणार असल्याने त्यांच्या समर्थकांतून आनंद व्यक्त करण्यात येत आहे.


छगन भुजबळ यांच्या माध्यमातून नाशिकमध्ये आणखी एक मंत्रीपद मिळणार आहे. महायुतीच्या पहिल्या मंत्रिमंडळामध्ये माणिकराव कोकाटे यांचा समावेश झाला होता. दरम्यान, आपल्याला डावलून माणिकराव कोकाटे यांना मंत्रीपद दिल्याने छगन भुजबळ यांनी जाहिर मेळाव्यातून नाराजी व्यक्त केली होती. राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्या माणिकराव कोकाटे यांना मंत्रिपदाची संधी आणि ज्येष्ठते नुसार छगन भुजबळ यांना डावलल्याने भुजबळ समर्थकांनी तिव्र नाराजी व्यक्त करत थेट स्वतंत्र पक्ष स्थापन करण्याच्या भुमिका कार्यकर्ता मेळाव्यातून जाहिर केल्या होत्या.


त्यातच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याच्याशी असलेल्या संबंधावरून धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर आता छगन भुजबळ यांची एन्ट्री होणार आहे. दरम्यान, मंत्रीमंडळात जातीचा समतोल राखण्यासाठी ओबीसीच्या जागी ओबीसीची वर्णी लावण्यात येत असली तरी, कालच्या बीड दौर्‍यात मात्र अजित पवार यांनी भुजबळ यांच्या मंत्रीपदा विषय चुप्पी साधत आढावा बैठक, जाहिर सभा गुंडाळून दौरा आटोपता घेतला. त्यातच अंबाजोगाई येथे शिवराज दिवटे याची भेट न घेता परतल्याने अजित पवार यांना मराठा समन्वयकांचा रोष पत्कारावा लागला. आणि त्यातच आज छगन भुजबळ यांच्या शपतविधीची भर पडल्याचे बोलले जात आहे.

Comments


bottom of page