छत्तीसगडमधील कोंटा-एराबोरा रस्त्यावर आयडी स्फोट; एसपी गिरीपुंजे यांचा मृत्यू
- Navnath Yewale
- 5 days ago
- 2 min read

छत्तीगडमधील सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या आयईडी सुरक्षा दलांच्या एका पथकावर हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. या आयईडी स्फोटात एएसपी आकाश राव गिरीपुंजे गंभीर जखमी झाल. याशिवाय इतर अधिकारी आणि सैनिकही जखमी झाले आहेत. जखमी सैनिकांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच गिरीपुंजे यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर इतर जखमींवर उपचार सुरू आहेत.
बस्तरचे आयजी पी. सुंदरराज म्हणाले की, सीपीआय (एम) ने 10 जून रोजी दिलेल्या भारत बंदच्या आवाहनाच्या पार्श्वभूमिकवर कोणतीही नक्षलवादी घटना टाळण्यासाठी एएसपी आकाश राव गिरीपुंजे परिसरात पायी गस्त घालत होते. त्याचवेळी, कोंटा-एराबोरा रस्त्यावर दोंड्राजवळ हा आयईडी स्फोट झाला. प्रेशर आयईडीच्या स्फोटात कोंटा विभागाचे एएसपी आकाश राव गिरीपुंजे गंभीर जखमी झाले. सुकमा येथील या प्रेशर आयईडी स्फोटात काही इतर अधिकारी आणि सैनिकही जखमी झाले. जमखमींना रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच गिरीपुंजे यांचा मृत्यू झाला.
सुकमाचे एसपी किरण चौहान म्हणाले की, इतर अनेक अधिकारी आणि सैनिक जखमी झाले आहेत. या स्फोटात कोंटा पालिस स्टेशनचे प्रभारी (पीआय) आणि एसडीपीओ देखील जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. कोंटा पोलिस स्टेशन परिसरात पोलिस पथक गस्तीवर असताना ही घटना घडली. या हल्ल्यामुळे नक्षलवादी हिंसाचाराची भीषणता पुन्हा एकदा उघड झाली आहे. पोलिस आणि सुरक्षा दलांनी परिसरात शोध मोहिम तीव्र केली आहे.
या घटनेत गिरीपुंजे, इतर अधिकारी आणि सैनिक जखमी झाले. सर्व जखमींना कोंटा रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे अतिरिक्त पोलिस अधिक्षक गिरीपुंजे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झला, असे अधिकार्यांनी सांगितले. इतर जखमी सैनिक धोक्याबाहेर असल्याचे अधिकार्यांनी सांगितले. त्यांनी सांगितले की, परिसरात नक्षलवायांविरुद्ध मोहिम सुरूच आहे.
नक्षलवाद्यांनी लावलेल्या प्रेशर आयईडी यंत्रामुळे हा स्फोट झाल्याचा संशय आहे. यामध्ये एकूण चार पोलिस जखमी झाले. सर्व जयमींना कोंटा रुग्णालयात नेण्यात आले. एएसपी आकाश राव यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. यानंतर,त्यांना चांगल्या उपचारांसाठी रायपूरला पाठवण्याची तयारी सुरू होती. मात्र, उपचारादरम्यान मृत्यू झाला.
नक्षलवाद्यांविरुद्ध मोहिम सुरूच राहिल - गृहमंत्री
छत्तीसगडचे गृहमंत्री विजय शर्मा यांनी, नक्षलवाद्यांनी केलेले भ्याड कृत्य असल्याची टिका केली आहे. पण अशा घटनांमुळे नक्षलवाद्यांविरुद्ध सुरू असलेल्या मोहिमेत कोणताही अडथळा येणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे. पण जर कोणत्याही परिस्थितीत नक्षलवाद्यांशी वाटाघाटीचा विचार आला तर अशा घटनांमुळे तो उद्धवस्त होतो. असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
Comentarios