top of page

छत्रपती संभाजीनगर; पाच लाख रुपयांच्या लाचेसह उपजिल्हाधिाकरी, लिपिक एसीबीच्या जाळ्यात





जिल्हाधिकारी कार्यालयातील निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांना पाच लाखांची लाच घेतल्या प्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. त्यांच्या कार्यालयातील महसूल सहाय्यकाला देखील ताब्यात घेण्यात आले. मंगळवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ही कारवाई करण्यात आली. वर्ग देानची जमिन वर्ग एक मध्ये करण्यासाठी चलन जनरेट करण्यासाठी ही लाच घेण्यात आली.


आरोपी खिरोळकर यांच्या घराची झडती घेण्याची प्रक्रिया रात्री अशीरा पर्यंत होती. या प्रकरणातील 49 वर्षीय तक्रारदार आणि त्यांचे भागीदार यांनी मौजे तिसगाव येथील 6 एकर 16 गुंठे ही वर्ग देानची जमीन शासनाची परवानगी घेऊन रजिस्टरी खरेदी खत करुन 2023 मध्ये विकत घेतलेली आहे. हि जमीन वर्ग दोनची असल्यामुळे ती खरेदी करण्यासाठी शासनास लागणारे चलन जनरेट करून देण्यासाठी या पूर्वी आरोपींनी 23 लाख रुपये घेतले होते.


या जमिनीच्या नजराण्याचा दुसरा टप्पा पुन्हा शासनाकडे भरावयाचा होता. त्यासाठी लागणारे चलन जनरेट करुन देण्यासाठी आरडीसी विनोद खिरोळकर आणि महसूल सहाय्यक दिपक त्रिभुवन यांनी 18 लाखांची मागणी केली होती. या प्रकरणी लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाच लुचपत विभागाची संपर्क साधला होता. 26 मेला या तक्रारीची पडताळणी केली असता खिरोळकर यांच्या केबीनमध्ये पाच लाख रुपये पाहिले आणि फाईल कंप्लेट झाल्यावर तेरा लाख रुपये देण्याचे ठरले होते.

27 मेला तक्रारदाराला आरोपी त्रिभुवन याने जिल्हाधिकारी कार्यालया समोरील रोडवर पाच लाखाची लाचेची रक्कम घेऊन बोलावले होते. या ठिकाणी सापळा रचून पथकाने दिलीप त्रिभुवनला अटक केली. यानंतर स्वतंत्र पथकाने विनोद खिरोळकर यांना ताब्यात घेतले. या प्रकरणी आरोपी निवासी उपजिल्हाधिकारी विनोद गोंडूराव खिरोळकर वय 51 आणि दिपक त्रिभुवन वस 40 यांना अटक करण्यात आली असून सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


दरम्यान खिरोळकर यांच्या अंगझडतीमध्ये आयफोन आणि केबीनमध्ये रोख 75 हजाराची रक्कम आढळून आली आहे. हि कारवाई पोलिस अधिक्षक संदिप आटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक शांतीलाल चव्हाण, गोरखनाथ गांगुर्डे, दिलीप साबळे, अमोल धस, केशव दिंडे, चेनसिंग घुसिंगे, राजेंद्र सिनकर, अनवेज शेख, युवराज हिवाळे, घुगरे, काळे, जिवडे, कंदे, डोंगरदिवे, इंगळे, राम गोरे, बनकर आणि नागरगोजे यांनी केली.

コメント


bottom of page