छत्रपती संभाजीनगर हादरलं: लग्नास नकार, प्रियकराच्या पत्नीची घरात घूसून नियोजीत हत्या ! , गळा चिरला, पोट फाडले, मानेत चाकू खूपसला; चाकूचे 10 वार वाळूंज एमआयडीसीतील घटना
- Navnath Yewale
- Apr 22
- 4 min read

छत्रपती संभाजीनगर: क्षणिक मोह कसा आयुष्य उध्दवस्त करतो, सोबतच आपले लोकही हिरावून घेतो, हे आज बुधवार (दि.22) सकाळी 9:30च्या सुमारास वाळूंज एमआयडीसीतील वडगाव कोल्हाटीतील साईश्रद्धा पार्कमध्ये घडलेल्या निर्घुण हत्येने समोर आले. बलात्कार आणि आर्थिक फसवणूकीचे आरोप लावणार्या 44 वर्षीय प्रेयसीने थेट त्याच्या घरी येत, त्याच्या पत्नीची चाकूने 8 ते 10 वार करून निर्घुण हत्या केली. साधना महेंद्र सोनपेठकर (वय 38 रा. साईश्रद्धा पार्क सोसायटी, बजाजनगर, वाळूज एमआयडीसी परिसर, छत्रपती संभाजीनगर) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव असून शैला सुनील सोना (वय 44 रा. बजाजनगर) असे मारेकरी महिलेचे नाव आहे.
या प्रकरणात मृत साधना यांच्या सासू केशरबाई रमेश सोनपेठकर (वय 65 मूळ रा. निवळी ता.जि. लातूर हल्ली मुक्काम साईश्रद्धा पार्क वडगाव कोल्हाटी, वाळूंज एमआयडीसी) यांनी वाळूंज एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली, की त्या त्यांचे पती व लहानग्या मुलासह रातात. मोठा मुलगा महेंद्र रमेश सोनपेठकर हा त्याची पत्नी साधनासोबत वडगाव कोल्हाटीतील साईश्रद्धा पार्कमध्ये राहतो. तीन महिन्यांपूर्वी केशरबाई यांना पॅरालिसीसचा झटका आल्याने औषधोपचारासाठी त्या मोठा मुलगा महेंद्र यांच्याकडे आल्या आहेत. तेव्हापासून त्या महेंद्र यांच्याकडेच राहतात. महेंद्रविरुद्ध शैला सोनार हिने वाळूज एमआयडीसी पालीस ठाण्यात कोणत्यातरी पैशांच्या वादावरून तक्रार दिल्याने दोन वर्षापूर्वी गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून केशरबाई या शैलाला ओळखतात. आज सकाळी 9:30 ला केशरबाई आणि साधना या घरी असताना शैला ही त्यांच्या घरी आली.
घरातील सोप्यावर जाऊन बसली. तेव्हा तिच्याजवळ एक पर्स होती. केशरबाईने तिला विचारणा केली, की तू का आली? तेव्हा तिने सांगितले, की तुमचा मुलगा महेंद्र कुठे आहे, त्याच्याकडून मला पैसे घ्याचे आहेत. तेव्हा केशरबाई तिला म्हणाल्या, की तू यापूर्वी माझ्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे जू त्याला विनाकारण का त्रास देते... त्याचवेळी घरातून साधना या समोरच्या खोलीत आल्या. त्यांनीही शैलाला सुनावले, की तू आमच्या घरात का आली? त्यावरून शैलाने साधना यांच्यासोबत भांडण करायला सुरुवात केली. शैलीने तिच्या पर्समधून काळी बंदूक बाहेर काढली. ती साधना यांच्या डोक्याला लावली आणि धमकावू लागली, की आज मी तुमच्या कुटुंबाला जिवानीशी मारूनच टाकते.. तेव्हा केशरबाई या सोफ्यावरुन उठल्या आणि शैलाच्यवा हाताला झटका दिला. तेव्हा बंदूक खाली पडली.
शैलाने ती बंदूक पुन्हा उचलली आणि ती बंदूक केशरबाईच्या याचया डोक्याला लावून धमकावले, की मी तुला मारून टाकते. त्यानंतर केशरबाईंनी पुन्हा तिच्या हाताला हिसका मारला असता तिच्या हातातील बंदूक पुन्हा खाली पडली. केशरबाईंनी ती बंदूक उचलून घराच्या खिडकीतून बाहेर फेकली. त्यावर शैलाने केरबाईंनी बंदूक कुठे फेकली असे विचारले असता त्यावर केशरबाई तिला म्हणाल्या, की तुला काय कराचे ते कर, पण माझ्या सुनेला मारू नको.. त्यावर शैलाने तिच्याजवळ असलेल्या पर्समधून एक काळ्या रंगाची बाटली व धारदार चाकू बाहेर काढून साधना व केशरबाई तोंडावर स्प्रे मारला. त्यामुळे साधना या खाली पडल्या, केशरबाई यांच्या डोळ्यांत व चेहर्यावर आग होऊ लागली. केशरबाई यांनी डोळे चोळत पाहिले असता शैला ही साधना यांच्या डोक्यावर, मानेवर, पाठीमागे चाकूने जोरजोरात वार करत होती. केशरबाई या साधना यांना वाचविण्यासाठी गेल्या असता शैलाने त्यांना जोरात धक्का मारून ढकलून दिले. केशरबाई वृद्धत्वामुळे तिचा प्रतिकार करू शकल्या नाही. त्यानंतर शैलाने चाकू स्वत:च्या हातावरही मारून घेतला.
नंतर घरातील बाथरूममध्ये जाऊन तिने तिचे हात व चाकू धुवून चाकू बाथरूममध्ये ठेवून ती किचनमध्ये आली व कुणाशी तरी फोनवर बोलत होती. केशरबाई यांनी आरडाओरडा केल्याने अपार्टमेंटमधील लोक धावून आले मात्र शैलाने दरवाजा आतून बंद केलेला होता. लोकांनी पोलिसांना फोन करून बोलावून घेतले. पोलिसांनी येऊन दरवाजा तोडून शैलाला ताब्यात घेतले. तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यता आला आहे. हत्येची क्रूरता अंगावर शहारे आणणारी आहे. साधना यांच्या दोन्ही बाजूंनी गळ्यावर वार केल्यानंतर शैलाने समोर गळा चिरला, पोट फाडले आहे. दोन्ही बरगड्यांवर दोन्ही बाजूंनी वार करत छातीखाली आणि पोटर्यांवर चाकूचे सपासप वार करून नंतर मानेत चाकू खुपसल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. एकून 8 ते 10 वार झाले आहेत.
दरम्यान, घटनेला अनेक कंगोरे आहेत. घटनेच्या अधिक खोलवर जाण्यासाठी मेट्रोपोलिस पोस्टच्या टीमने 23 ऑगस्ट 2024 रोजी शैलाने वाळूज एमआयडीसी पोलिसांत काय तक्रार दिली होती, हे तपासले. त्या तक्रारीनुसार, शैला बाजाजनगरच्या प्रताप चौकात व्ही.एस. प्रेसीशन फर्म चालवते. तिचे लग्न 12 मार्च 2001 रोजी सुनिल बंडू सोनार यांच्यासोबत झाले होते. त्यांच्यापासून तिला एक मुलगा, एक मुलगी (लग्न झालेली) आहे. शैला पतीपासून 2017 पासून विभक्त राहते. 2009 मध्ये ती के.सी. प्रेसीशन कंपनीत नोकरीला होती. त्यावेळी तेथे मॅनेजर म्हणून महेंद्र होते. त्या कंपनीत शैलाने 2012 पर्यंत नोकरी केली. तक्रारीतील अरोपानुसार, त्यादरम्यानर महेेंद्र यांनी तिच्याशी ओळख वाढवून तिला 23 नोव्हेंबर 2011 रोजी रात्री 7 ते 8 च्या सुमारास दुचाकीने कमळापूर रोडवर नेत अंधाराचा फायदा घेत मोकळ्या जागेत तिच्यावर बळजबरीने शारीरिक संबंध केले.
तक्रारीनुसार, त्याच्या त्रासाला कंटाळफन शैलाने 2012 मध्ये कंपनी सोडून दिली त्याआधी तिने महेंद्र याच्या ओळखीने 75 हजार रुपयांची विमा पॉलिसी काढली होती. मात्र पॉलिसीची पावती मिळत नसल्याने तिने पैसे परत करा किंवा पावती द्या असा तगादा महेंद्र यांच्याकडे लावला. याचदरम्यान पॉलिसीच्या पावतीवरून दोघांत वाद होऊन महेंद्र यांनी तिला ढकलून दिल्याने ती जखमी झाली होती. उपचारादरम्यान बिंग फूटू नये म्हणून महेंद्र यांनी तिला 75 हजारांचा धनादेश दिला. मात्र हा धनादेशही वटला नाही. तिने याबाबत त्याला जाब विचारला त्यानंतर महेंद्र यांनी शैलाच्या पतील तिच्या च्यारित्र्याबाबत माहिती दिली. त्यामुळे तिच्या पतीने तिच्यापासून विभक्त राहायला सुरूवात केली. तिने पतीकडे पोटगीसाठी न्यायालयात दावा दाखल केला. दाव्यानंतर महेंद्रने तिला पैसे परत करत माफी मागितली होती. शैलाला पतीने सोडल्याने ती मुलासह एकटीच राहत होती.
यादरम्यान महेंद्र तिच्याकडे आला व म्हणाला की माझ्यामुळे तुझ्या संसार मोडला. आता आपण लग्न करू, असे म्हणत त्याने लग्नाचे अमिष दाखवले. तिनेही त्याच्यावर विश्वास ठेवत त्याच्याशी पुन्हा शारीरिक संबंध ठेवायला सुरुवात केली. राजरोस तिच्यासोबत शरीरसंबंध ठेवत असताना लग्नाला मात्र तो टाळाटाळ करत होता. रात्री अपरात्री घरी येऊन तिला मारहाण करत होता. ऑगस्ट 2018 पासून एप्रिल 2024 पर्यंत त्याने तिच्या घरी येऊन लग्नाच्या आतिषाने शारीरिक संबंध ठेवले. मात्र लग्न केले नाही. महेंद्र याची नोकरी गेल्याने तो शैलाच्या कंपनीत काम करण्यासाठी मदत करत होता.
त्याचरदम्यान मे 2024 मध्ये शैला कंपनीत काम करत असताना महेंद्रने शैलासोब लगट करून मिठी मारण्याचा प्रयत्न केला, या झटापटीत शैलाची ओढणी मशीनमध्ये अडकली. ती काढताना उजवा हात त्याज जाऊन हाताची बोटे तुटली, हात फॅक्चर झाला, ओठाला जखम झाली होती. जखमी झाल्यामुळे शैलाने आरडा ओरड केली. त्यामुळे आजूबाजूचे लोक जमा झाले. त्यानंतर महेंद्र व तिच्या मुलाने तिला खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते. त्यावेळी महेंद्र याने तिला धमकी दिली होती, की तू जर घडलेली घटना कोणाला सांगितली तर तुला जीवे मारेन. त्याचबरोर दवाखान्याचा खर्चही त्याने स्वत:देण्याचे कबुल केले होते. असे तिने तक्रारीत म्हटले होते. परंतु त्याने पैसे दिलेच नाही, असे तक्रारीत नमुद होते. या प्रकरणात पोलिसांनी महेंद्र याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे.



Comments