जगन्नांथ रथयात्रेत चेंगराचेंगरी तिन जणांचा मृत्यू; 6 जण जखमी
- Navnath Yewale
- Jun 29
- 2 min read

पुरी धाममधील एक दु:खद घटना आहे. येथे भगवान जगन्नाथाच्या सुरू असलेल्या रथयात्रेदरम्यान चेंगराचेंगरी झाली आहे. मिडिया रिपोर्टनुसार रविवारी पहाट——े 4:30 च्या दरम्यान हा अपघात झाला, जेव्हा भाविक श्री गुंडीचा मंदिरासमोर मोठ्या संख्येने भगवानांचे दर्शन घेण्यासाठी जमले होते, याचदरम्यान, खूप धक्काबुक्की आणि चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली, ज्यामध्ये आतापर्यंत 3 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 6 जण जखमी असल्याचे सांगितले जात आहे. जखमींना ताबडतोब पुरी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ओडिशाचे कायदा मंत्री पृथ्वीराज हरिचंदन यांनी 3 जणांच्या मृत्यूची आणि 6 जणांच्या जखमींची पुष्टी केली आहे.
ओडिशाचे कायदा मंत्री पृथ्वीराज हरिचंदन म्हणाले की, ‘ही दुर्दैवी घटना आहे. आम्ही याची चौकशी करत आहोत. मी आज सकाळी मुख्यमंत्र्यांशी बोललो. आम्ही कडक कारवाई करत आहोत. डीजीपींना घटनास्थळी पाठवण्यात आले आहे. प्रचंड गर्दीत गुदमरल्याने 3 जणांचा मृत्यू झाला आहे. 6 ते 7 जण जखमी झाले आहेत. मी पुरीला जात आहे. मी फोनवरून परिस्थितीवर लक्ष ठेवत आहे. गर्दी नियंत्रित करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. अतिरिक्त पोलिस बल तैनात करण्यात आले आहे. घटनेची कारणे तपासली जात आहेत. परिस्थिती आता नियंत्रणात आहे आणि लोक दर्शन घेत आहेत.
दरम्यान, शनिवारीही 600 हून अधिक भाविक आजारी पडल्याची बातमी समोर आली होती. त्यापैेकी काही धक्क्यामुळे तर काही उष्णता आणि उन्हामुळे आजारी पडले. पुरीमध्ये कड सुरक्षा व्यवस्था करण्यात आली असली तरी पुरीमध्ये राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची एक टीम देखील तैनात करण्यात आली आहे. रथयात्रा दरम्यान सुरक्षा, देखरेख आणि वाहतूक व्यवस्थापन सुनिश्चित करण्यासाठी पुरी जिल्हा प्रशासनाने आर्टिफिशियल इंटेलिजेंस आधारित सीसीटीव्ही कॅमरे बसवले आहेत. सर्व विधी नियोजित कार्यक्रमानुसार पार पडत आहेत. तरीही, आज सकाळी चेंगराचेंगरीची घटना उघडकीस आली आहे.
27 मार्च पासून सुरू झालेल्या रथयात्रेत सहभागी होण्यासाठी लाखो भाविक पुरी येथे पोहोचले आहेत. हे ज्ञात आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की ही 9 दिवसांची यात्र 5 जुलै रोजी, शनिवारी भगवान बलभद्र देवी सुभद्रा आणि भगवान जगन्नाथ गुंडीचा मंदिरात पोहोचतील. हे त्यांच्या मावशीचे घर आहे. 9 दिवस राहिल्यानंतर, ते त्यांच्या घरी म्हणजेच पुरी मंदिरात परततील, परतीच्या प्रवासाला ‘बहुदा यात्रा’ म्हणतात. ही एममेव पुजा आहे. ज्यामध्ये भगवान जगन्नाथासोबत भाऊ- बहिणींची पूजा केली जाते. रथयात्रेत, कोणताही भक्त, मग तो कोणत्याही जातीचा, धर्माचा किंवा समुदयाचा असो- रथ ओढू शकतो. रथाची दोनी ओढल्याने मोक्ष मिळतो आणि जन्म -मृत्यूच्या चक्रातून मुक्तता मिळते.
Commenti