top of page

जगातील अनेक प्रगत देशात ईव्हिएमवर निवडणूका होत नाहीत !




महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूकीत महायुतीला अभूतपूर्व यश मिळाले आणि महाविकास आघाडचा दारुण पराभव झाला. यानंतर विरोधाकांनी पराभवाची खापर ईव्हिएम मशीनवर फोडले. अमरिकेच्या गुप्पचर विभागाच्या संचालक तुलसी गॅबार्ड यांनी केलेल्या एका विधानानंतर या चर्चांना उधाण आले आहे.

अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर संचालक तुलसी गॅबार्ड म्हणाल्या की, निवडणूक निकालांमध्ये फेरफार करण्यासाठी ईव्हिएम सहजपणे हॅक केले जाऊ शकतात. म्हणूनच, मतदारांना निवडणुकिच्या पारदर्शकतेवर विश्वास ठेवण्यासाठी संपूर्ण अमेरिकेत कागदी मतपत्रिका(बॅलेट पेपर) लागू करण्याची गरज आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या उपस्थितीत त्यांनी हे सांगितले.गॅबार्ड यांचे हे विधान सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत आहे. यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रतिक्रीया दिली आहे.


..तर ईव्हिएमवर चर्चा व्हायला हवी.

ईव्हिएम सहजपणे हॅक करून निवडणूक निकालांमध्ये फेरफार करता येतो असे अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर विभागाच्या संचालक तुलसी गॅबार्ड यांनी म्हटले आहे. यावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, जगातील अनेक प्रगत देशातही ईव्हिएमवर विनवडणूका होत नाही. ईव्हिएम संदर्भात खूप आक्षेप आहे. त्याची निवडणूक अयोगाने दखल घेतली पाहिजे आणि उत्तर दिले पाहिजे पण भारतीय निवडणूक आयोग त्यावर गप्प आहे उत्तर देत नाही. ईव्हिएम व मतदारयाद्या घोटळ्याप्रश्नी काँग्रेस पक्ष निवडणूक आयोगाला वारंवार भेटत आहे.



व्हीव्हीपॅट ची मतमोजणी करावी ही मागणीही आम्ही केली होती. पण निवडणूक आयोग काहीच बोलत नाही, पण मुख्यमंत्री फडणवीस त्यावर उत्तर देत आहेत. लोकशाही टिकवायची असेल तर निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता असली पाहिजे. आता अमेरिकेनेही ईव्हिएमवर मोठा सवाल उपस्थित केला, असल्याने चर्चा झाली पाहिजे. पंतप्रधान, भाजपा व एनडीए सरकारने यावर बोलले पाहिजे, असेेेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

दरम्यान, काँंग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी गॅबार्ड यांच्या वक्तव्याला उत्तर न दिल्याबद्दल भारतीय निवडणूक अयोग आणि केंद्रातील भाजप सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची स्वत:हून दखल घ्यावी, अशी मागणी केली.

Comments


bottom of page