top of page

जगातील या एकमेव देशात असते, फक्त 40 मिनिटांची रात्र



पृथ्वीवर अनेक असे ठिकाणे आहेत, जिथे विचित्र घटना घडत असतात. प्रत्येकाला त्यांच्याबद्दल जाणून घ्यायचे आहे. पण तुम्ही कधी ऐकले आहे का, जगात असा एक देश आहे जिथे रात्र फक्त 40 मिनिटे असते. हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण हे खरे आहे. या ठिकाणी रात्री 1:30 वाजता दिवस मावळतो. 40 मिनिटे संपताच, सूर्य पुन्हा उगवतो. तुम्हालाही कदाचित विश्वास बसणार नाही, पण हे खरं आहे. नॉर्वे हा असा देश आहे, जिथे निसर्गाने एक अनोखा चमत्कार घडवला आहे. येथील काही ठिकाणी उन्हाळ्याच्या महिन्यांत रात्रीचा वेळ फक्त 40 मिनिटे असतो. याचा अर्थ असा की, जेव्हा जगाच्या इतर भागात गाढ रात्र असते, तेव्हा नॉर्वेमध्ये सूर्यास्तानंतर, काही मिनिटांनी सूर्योदय होतो.


येथे 76 दिवस सूर्य कधीच मावळत नाही

नॉर्वे हा युरोपमधील एक सुंदर देश आहे, जो आर्क्टिक सर्कलमध्ये आहे. याला ‘मध्यरात्रीच्या सूर्याची भूमी ’ असेही म्हणतात. येथे मे ते जुलै दरम्यान 76 दिवस सूर्य कधीच मावळत नाही. या काळात, रात्रीच्या वेळीही सूर्य आकाशात राहतो. अंटार्क्टिक वर्तुळात असल्याने, येथे वर्षभर थंडी असते.


त्याला मध्यरात्रीच्या सूर्याची भूमी का म्हणतात?

युरोप खंडाच्या उत्तरेला असलेले ,नॉर्वे हे उत्तर धु्रवाच्या अगदी जवळ आहे. यामुळेच येथे खूप थंडी असते. याशिवाय, या देशात अडीच महिने म्हणजेच 76 दिवस रात्र फक्त 40 मिनिटांची असते. येथे रात्री 12:40 वाजता सूर्यास्त होतो. सूर्य अगदी 40 मिनिटांनी दुपारी 1:30 वाजता उगवतो. म्हणूनच नॉर्वेला मध्यरात्रीच्या सूर्याची भूमी असेही म्हणतात.


दिनचर्येवर होतो परिणाम

या नैसर्गिक आश्चर्याचा नॉर्वेमधील लोकांच्या दैनंदिन दिनचर्येवरही खोलवर परिणाम होतो. येथील रहिवासी ‘मिडनाईट सन’ उत्सवासारख्या कार्यक्रमांद्वारे हा काळ साजरा करतात. मध्यरा़त्रीही लोक समुद्रकिणार्‍यावर फिरतात, ट्रेकिंग करतात बाहेरच्या क्रियाकलापांचा आनंद घेतात. तथापि, सतत प्रकाशामुळे झोपेशी संबधीत समस्या देखील दिसून येतात.


पर्यटकांची सतत गर्दी असते

हे दृश्य पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक नॉर्वेमध्ये येतात. मध्यरा़त्री लोक बोटिंग, मासेमारी आणि पर्वत चढणे यासारख्या क्रियाकलापांचा आनंद घेतात. लोफोटन बेट, ट्रोम्सो आणि उत्तर केप सारखी ठिकाणे प्रसिद्ध आहेत. मध्यरात्रीच्या सूर्याव्यतिरिक्त, नॉर्वेमध्ये फजॉर्ड्स, हिमनद्या आणि नॉर्दर्न लाईट्स अशी अनेक नैसर्गिक आकर्षणे आहेत.

Comments


bottom of page