जम्मूच्या पुलवामाध्ये सुरक्षादलाच्या चकमकीत तीन दहशतवादी ठार पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांचा समावेश; 14 पैकी 6 दहशतवाद्यांना कंठस्नान
- Navnath Yewale
- May 15
- 2 min read

पहलगामा हल्ल्यानंतर भारतीय लष्कराकडून पाकिस्तानमध्ये घुसून ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवण्यात आले. याशिवाय दहशतवाद्याच्या सफाया करण्यासाठी जम्मू काश्मीर च्या खोर्यात सुरक्षादलांकडून ‘ऑपरेशन ऑलआऊट’ राबवण्यात येत आहे. त्यानुसार (13 मे) रोजी शोपिया मध्ये पहलगाम हल्ल्यातील तीन दहशतवाद्यांना सुरक्षादलांनी कंठस्नान घातले. ‘ऑपरेशन ऑलआऊट’ अंतर्गत आज जम्मूच्या पुलवामा क्षेत्रातील त्रालमध्ये आणखी तीन दहशतवाद्यांचा सुरक्षादलांनी खात्मा केला आहे.
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांचा असा शेवट हाईल की, त्याच्या पिढ्या आठवणीत राहतील असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठणाकावून सांगितले होते. भारतीय लष्कराने पाकिस्तानमध्ये घुसून ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहिमे अंतर्गत एअर स्ट्राईक केले. पाकिस्तानातील नऊ तळांवर हल्ला चढविण्यात आला ज्यामध्ये पाकिस्तानातील दहशतवादी संघटनातील सक्रीय शेकडो दहशतवादी मारले गेले. पहलगाम हल्ल्यात संबंध नसल्याचा पाकिस्तानने कांगावा केला पण भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानचा भुरखा फाडला.
भारत दहशवात खपवून घेणार नाही, दहशतवाद्यांना खातमा केला जाईल आणि यापूढे दहशतवादी कारवाईला युद्ध समजले जाईल या अटीवर भारत आणि पाकिस्ताना मध्ये शस्त्रबंदीची घोषणा करण्यात आली. पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात दहशतवाद्यांना शोधून मारण्याचे भाष्य केले होते. त्यानंतर अवघ्या काही तासात जम्मूच्या शोपिया मध्ये (13 मे) सुरक्षादलाच्या जवानांनी संशयीत दहशतवाद्यांचे पोस्टर जारी करून तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले.
आज सकाळी पहलगामच्या त्राल येथे नागरिक्षेत्रात जीव वाचवण्यासाठी तीन दहशतवादी घरात घुसून लपल्याची माहिती सुरक्षादलाच्या जवानांना मिळाली होती. त्यानुसार ‘ऑपरेशन ऑलआऊट’ अंतर्गत सुरक्षादलांच्या जवानांनी टक्नॉलॉजीचा वापर करत सावधगिरीने परिसरातील घरे खाली केली. यावेळेस दहशतवाद्यांची सुरक्षादलांची चकमक झाली. यामध्ये सकाळी सुरवातील एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आले. दहशतवाद्यांनी नागरिक्षेत्राचा अश्रय घेतल्याने सुरक्षादलास कारवाईसाठी मोठी कसरत घ्यावी लागली. आसपासचा परिसर मोकळा करून टेक्नॉलॉजीला बहादूरीची सांगड घालून तब्बल दोन तासांच्या चकमकी नंतर तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षादलांच्या जवानांना यश आले.
सुरक्षादलांचा मनोधैर्य वाढविण्यासाठी देशाचे संरक्षणमंत्री राजनाथसिंह जम्मू काश्मीरच्या दौर्यावर आहेत. श्रीनगरमध्ये सैनिकांशी संवाद साधणार आहेत जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर आब्दुल्ला, राज्यपाल मनोज सिन्हा यांचाही त्याच्या दौर्यात सहभाग आहे. दरम्यान, राजनाथसिंह यांनी सुरक्षादलाच्या जवानांशी संवाद साधत त्यांच्या बहादूरीचे कौतुक केले.
Commentaires