जम्मूच्या पुलवामा मध्ये सुरक्षादलांची चकमक 48 तासांत दुसरे सुरक्षदलाची दुसरी कारवाई; त्रालमध्ये एका दहशतवाद्याला कंठस्नान
- Navnath Yewale
- May 15
- 1 min read

जम्मू काश्मीरच्या दक्षीण काश्मीरमधील शोपिया मध्ये नुकत्यात झालेल्या चकमकीत सुरक्षादलांनी तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. दरम्यान, शोपिया मध्ये सुरक्षादलाच्या कारवाईनंतर पुलवामााच्या त्राल मध्ये सुरक्षादलांच्या जवानांनी दहशतवाद्यांना घेरले आहे. सकाळपासून सुरू असलेल्या या कारवाईत एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आले असून उर्वरित दोन दहशतवाद्यांशी सुरक्षादलाची चकमक सुरू आहे. जम्मु काश्मीर खोर्यात सुरक्षादलाची दहशतवाद्या विरोधात शोध मोहिम सुरू करण्यात आली आहे. अवघ्या 48 तासात सुरक्षादलाची ही दुसरी कारवाई आहे.
पहलगाम हल्ल्यानंंतर भारतीय लष्कराने एअर स्ट्राईक करुन पाकिस्तानातील नऊ तळांवर मिसाईल हल्ला केला. या कारवाईत शंभराहून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यत आला. शस्त्रबंदी नंतर सीमावर्ती भागात पाकिस्तानच्या कुरापतीला भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिले. दहशतवाद्याच्या समुळ उच्चाटनासाठी भारतीय लष्कराने जम्मु काश्मीरच्या खोर्यात शोधी मोहिम सुरू केली आहे. त्यानुसार, (दि.13 मे) सुरक्षादलांच्या जवनांनी शोपियामध्ये तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. ज्यामध्ये पहलगाम हल्ल्यातील दोन दहशतवाद्यांचा समावेश होता.
प्राप्त माहिती नुसार आज सकाळ पासून सुरक्षादलाच्या जवानांची पुलवामाच्या त्राल मध्ये दहशवाद्यांशी चकमक सुरू आहे. या कारवाईमध्ये एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आले असून आणखी दोन दहशतवादी याठिकाणी लपल्याचा अंदाज व्यक्त करण्यता आला आहे. सुरक्षादलाची दहशतवाद्यांशी चकमक सुरू असून लवकरच उर्वरित दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात येणार असल्याची माहिती आहे.
Comentários