top of page

जम्मू-काश्मिरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला

27 पर्यटकांचा मृत्यू ; अनेकजन जखमी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह श्रीनगरकडे रवाना



जम्मू- काश्मिरमधील पहलागममध्ये दहशवद्यांनी पर्यकांवर हल्ला केला आहे. दहशवाद्यांनी केलेल्या गोळीबारात 27 पर्यकांचा मृत्यू झाला असून अनेकजन जखमी झाले आहेत. सुरक्षा दलाकडून परिसरात शोध मोहिम सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह श्रीनगरकडे रवाना झाले आहेत.


हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियातून गृहमंत्री अमित शाहशी फोनवर चर्चा केली. दहशतवादी हल्ल्यानंतर अधिकार्‍यांसोबत बैठकही घेतली. अमित शाह यांना घटनास्थळी जाण्याचे निर्देश मोदींनी दिले आहेत.

अमरनाथ यात्रेला लवकरच सुरवात होणार आहे. त्या आधी झालेल्या या हल्ल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. पर्यटकांना टार्गेट करण्यात आलं असून ऐन पर्यटनाच्या हंगामात झालेल्या या घटनेमुळं खळबळ उडाली आहे. पहलगाममधील अशा भागात हा हल्ला झाला आहे जिथं केवळ पायी किंवा घोड्यावरुन जाता येतं या हल्ल्यात काही घोडेही जखमी झाले आहेत.



दहशतवादी लष्कराच्या गणवेशात आले होते अशीही माहिती सुत्रांनी दिली. तसंच त्यानी पर्यटकांना त्यांचा धर्म विचारल्याचा दावा हल्ल्यावेळी घटनास्थळी असेल्या महिलेनं केला आहे. नागरिकांचे आयडीकार्ड पाहून त्यांच्यावर गोळीबार केल्याची माहितीही महिलेनं दिली. हल्ला झाल्या नंतर जखमींना रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं आहे.


दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा दलाकडून शोधमोहिम राबवली जात आहे. केंद्रीय गृृहमंत्री अमित शाह यांनी पहलगाममधील वरिष्ठ अधिकार्‍यांशी चर्चा केली आहे. तसंच अमित शाह हे श्रीनगरला रवाना झाले आहेत. या हल्ल्यात सहभागी असलेल्यांवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल. कोणालाही सोडलं जाणार नाही अशा शब्दात अमित शाह यांनी हल्ल्यानंतर प्रतिक्रीया दिली.

Comments


bottom of page