जयंत पाटलांचा अखेर राजीनामा; शशिकांत शिंदे राष्ट्रवादी (श.प) पक्षाचे नवे प्रदेशाध्यक्ष
- Navnath Yewale
- Jul 15
- 2 min read

अगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये भाकरी फिरविली जाणार असल्याचे संकेत यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून देण्यात आले होते. अखेर जयंत पाटलांनी आपल्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे यांची घोषणा करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वरिष्ठ नेते जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त होण्याचे संकेत दिले होते. जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापण दिनाच्या कार्यक्रमात पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या समारेच प्रदेशाध्यक्षपदा पासून बाजूला होण्याचे भाष्य केलं होतं.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे यांची घोषणा करण्यात आली आहे. मंगळवारी (15 जूलै) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची महत्वपूर्ण बैठक पार पडली. प्रदेशाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी शरद पवार यांनी मंगळवारी पक्षातील नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत जयंत पाटील यांच्या जागी प्रदेशाध्यक्ष म्हणून शशिकांत शिंदे यांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आला. येत्या काळात पक्षवाढीवर भर देण्याचे अव्हान नवे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्यासमोर राहणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे सात वर्षे या पदावर होते. एप्रील 2018 मध्ये पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांची निवड करण्यात आली होती. जूलै 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडेपर्यंत ते एकसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते. त्यांनतर ते शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते. 12 जूलै 2025 रोजी त्यांनी आपल्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला असल्याच्या चर्चामुळे मोठी खळबळ उडाली होती.
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठे यश मिळाले. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांचा करिष्मा चालला नाही आणि त्यांच्या पक्षाला सपाटून मार खावा लागला. त्यात प्रदेशाध्यक्ष म्हणून जयंत पाटील यांची कामगिरी सरस ठरली नाही. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मराठवाडा विदर्भात पक्षवाढ करण्यात त्यांना अपयश आले.
त्यामुळेच जयंत पाटलांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात जयंत पाटील यांनी पवार साहेबांनी मला बरीच संधी दिली. सात वर्षाच्या कालावधी पासून मी प्रदेशाध्यक्ष आहे. त्यामुळे नव्या चेहर्यांना संधी देणं अवश्यक असल्याचं म्हटलं होतं. पण त्यांच्या थांबण्याच्या भुमिकेनंतर बालगंधर्व रंगमंदीर येथे एकच गोंधळ झाला. अनेक कार्यकर्त्यांनी उठून त्यांच्या वक्तव्याला विरोधही दर्शवला होता. सात वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी पक्षासाठी मोठी मेहनत घेतली.


Comments