top of page

जरांगे पाटलांचा ‘गणिमी कावा’: 29 ऑगस्टच्या आंदोलनास मुंबई पोलिसांकडे परवानगीचा अर्ज

Aug 18
1 min read

मुंबई: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झालेले मराठा आंदोलक मनेाज जरांगे पाईल यांनी आगामी 29 ऑगस्टच्या आंदोलनासाठी ‘ गनिमी कावा वापरणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर आता या आंदोलनासंदर्भात एक मोठी आणि रजाकीय वर्तुळात खळबळ उडवून देणारी अपडेट समोर आली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्टपासून सुरू होणारे आंदोलन हे अंतरवाली सराटीमध्ये करणार असल्याचे जाहिर केले होते. मात्र, गनिमी कावा असेल याचा अंदाज बांधला जात होता.


जरांगे पाटलांच्या या आंदेालनासाठी थेट मुंबईतील आझाद मैदान पोलिस ठाण्यात परवानगीसाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता 29 ऑगस्टचे मुख्य आंदोलन अंतरवाली सराटीत होणार की थेट मुंबईत्र धडकणार, असा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार मराठा समाजाने आता अंतरवाली सराटीऐवजी थेट राज्याची राजधानी असलेल्या मुंबईतच भव्य आंदोलन उभारण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे. विशेष म्हणजे, अद्याप अंतरवाली सराटीतील आंदोलनासाठी प्रशासनाकडे कोणतीही अधिकृत परवानगी मागण्यात आलेली नाही. दुसरीकडे मात्र, अझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी मिळवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहे.


या अर्जामध्ये मनोज जरांगे पाटलांचे निकटवर्तीय सहकारी गंगाधर काळकुटे आणि पांडुरंग तारख यांची नावे असल्याची माहिती आहे. गंगाधर काळकुटे, अ‍ॅड. अशिष गायकवाड आणि त्यांच्या सहकार्‍यांच्या माध्यमातून मुंबई पोलिस प्रशासनाकडून परवानगी मिळवण्यासाठी पाठपुरावा केला जात आहे. जरांगे पाटलांच्या ‘गनिमी कावा’ या इशार्‍यानंतर मुंबईत परवानगीसाठी अर्ज दाखल झाल्याने राज्य सरकार आणि पोलिस प्रशासनाची झोप उडाली आहे. आता हे आंदोलन मुंबईत धडकल्यास सरकार यावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments


bottom of page