जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांवर गंभीर आरोप
- Navnath Yewale
- Jul 19
- 2 min read
मंत्री शिरसाठांना मुख्यमंत्री फडणवीसांनी फूस लावली; पडताळण्या रोखल्या

मराठा साजच्या जातपडताळणी बाबात आम्ही सामाजीकन्यायमंत्री संजय शिरसाठ यांनाच बोलत होतो, पण आता आम्हाला कळालं आहे की, मंत्री शिरसाठ यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फूस लावली आहे. मंत्री शिरसाठ यांना सांगितलं आहे की, मराठा समाजाच्या जातपडताळणी देवू नका असा गंभीर आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केला आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आंदोलनाचा एल्गार पुकारला आहे. आरक्षण मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतिने 29 ऑगस्टला मुंबईत मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. संभाव्य मोर्चाच्या पार्श्वभुमिवर मनोज जरांगे पाटील यांनी राज्यीरात बैठकांचा धडाका सुरू केला
आहे.
मोर्चा नियोजनासाठी जरांगे पाटलांचे शुक्रवार (18 जूलै) पासून पुण्यात बैठकांचे सत्र सुरू आहे. आज जरांगे पाटील माध्यम प्रतिनिधींसी संवाद साधताना म्हणाले की, आतापर्यंत आम्ही मंत्री संजय शिरसाठ यांना बोलत होतो, पण आत्ताच आम्हाला महिती मिळाली की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिरसाठ यांना मराठा समाजाच्या जातपडताळणी देवू नका अशी फूस लावली आहे. फडणवीस साहेब असं वागू नका, हे जड जाईल. आमच्या मागण्या मान्य करून त्याची अंमलबजावणी करा तुमचं राजकारण तुम्हाला लख-लाभ!.
मागण्या मान्यकरा आम्ही गुलाल घेऊन येतो. विधानभवन परिसरतील राड्यावर बाबत बोलताना पाटील म्हणाले की, यांचं काही खर नाही ते गोट्या खेळल्या प्रमाणे नाटकं सुरू असतेत. त्यांच्याबद्दल काय बोलायचं. संभाव्य काळात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील या खासदार सुनिल तटकरे यांच्या वक्तव्यावर पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पाटील म्हणाले की, राष्ट्रवादी कधीच दोन नाहीत, त्या केवळ आपल्यासाठी वेगळ्या आहेत, त्या आतुन एकच आहेत. त्यात काय नवल वाटण्यासारखं नाही. ठाकरे बंधू एकत्र येण्यावरही पत्रकारांनी पाटील यांना छेडलं असता लोकांची इच्छा आहे त्यांनी एकत्र यावं, ते स्वतंत्र अल्यावर पडतेत तर एकत्र आल्यावर पडतील? पण लोकांची इच्छा आहे ते एकत्र यावं. राज ठाकरे आता गुजरातवर बोलत आहेत, मागील काही दिवसांपूर्वी त्यांनीच गुजरातचा प्रचार केला आहे. ते एकत्र आले तर आमच्या काय पोटात दुखायचं कारण नाही.
राज्यात होवू घातलेल्या निवडणुकीच्या भुमिकेबद्दल पाटील म्हणाले की मी आत्ताच काही सांगू शकत नाही. आमचा लढा आरक्षणासाठी आहे तुर्तास राजकारण काही नाही.लोकसभेत आम्ही उतरलो तर सुपडा साफ झाला, विधानसभेत आम्ही नव्हतोच. त्यामुळे मराठ्यांना डिवचू नका आम्ही एकटेच 50 ते 55 टक्के आहोत. आमचां आरक्षण हा एकमेव उद्देश असून आज पुण्यात बहूजन संघटनांचा आंदोलनाला पाठिंबा मिळाला आहे.

गावगाड्यात पहिलेच आम्ही एक आहोत, आमच्या शिवाय त्यांचं कठत नाही आणि त्यांच्याशिवाय आमचं कठत नाही. गावपातळीवर सर्व ओबीसी आणि आम्ही एकत्र राहत आहोत. आम्ही 28 ऑगस्टला आंतरवाली येथू निघणार आहोत शहागड- पैठण- शेवगाव- अहिल्यानगर- आळेफाटा- शिवनेरीवर मुक्काम करून तिथली माती कपाळी लावणार आहोत. आता माझ्या पुढील आयुष्याचं काही खरं नाही जगलो तर परत येईल. नाही तर कपाळी माती लावून पुढे कल्याण मार्ग आझाद मैदान गाठणार असल्याचंही पाटील यावेळी म्हणाले.



Comments