जरांगे पाटलांनी सरकारला ललकारले; मराठा-ओबीसीमध्ये दंगल घडवण्यासाठी फडणवीस यांनी छगन भुजबळ यांना मंत्रीपद दिल्याचा आरोप !
- Navnath Yewale
- May 26
- 4 min read

मराठा आरक्षण मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी एल्गार पुकारला आहे. मराठा- कुणबी एकच, सगेसोयरे, हैदरबाद गॅझेट यासह इतर मागण्यांसाठी 29 ऑगस्ट 2025 रोजी मुंबई येथे आंदोलनाचा त्यांनी इशारा दिला. मुंबई आंदोलनाच्या पार्श्वभुमिवर रविवारी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली गोदापट्ट्यातील 123 गावांच्या प्रमुखांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीस मार्गदर्शन करताना जरांगे पाटील यांनी महायुती सरकारवर ताशेरे ओढत छगन भुजबळ यांच्या मंत्रिपदावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टिका केली.
महाकाळा (जि.जालना) येथे गोदापट्ट्यातील 123 गावच्या सकल मराठा समाज प्रमुखांची बैठक आयोजीत करण्यात आली होती. मुंबई येथे नियोजीत आंदोलना संदर्भात मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. आंदोलनाच्या पार्श्वभुमिवर यावेळी त्यांनी समाजासमोर तिन पर्याय ठेवले, ज्यांना मुंबईला यायचं आहे त्यांनी किमान पंधरा दिवसाची तयारी ठेवून यायचं आहे. सोबत जेवण, झोपण्यासाठी कपडे आदी बाबी सोबत ठेवायच्या आहेत. ज्यांना मुंबईला सोबत आंदोलनाला बसता येणार नाही आशांनी किमान दोन दिवस काम बुडून निरोप देण्यासाठी यायचं आहे.
महिला माता भगिनींनी ज्या रस्त्याने आंदोलक मुंबईकडे मार्गस्थ होतील त्या रस्त्याला आशिर्वाद देण्यासाठी येवून थांबायचं आहे. शिवाय नौकरदार वर्गाने किमान दोन दिवस रजा टाकून निरोप देण्यासाठी मुंबई पर्यंत यायच असे पर्याय ठेवून त्यांनी मुंबई येथील नियोजीत आंदोलनाची भुमिका मांडली. आता मराठा-कुणबी एकच असून त्याची आंमलबजावणी, हैदराबाद संस्थानचं गॅझेट, सातारा संस्थानच गॅझेट, बॉम्बे गव्हरमेंटचं गॅझेट, राज्यातील समाजबांधवावरील केसेस मागे घेणं असो की, आरक्षणासाठी बलिदान दिलेल्यांच्या वारसांना नौकरी अशा मागण्यांची आंमलबजावणी होईपर्यंत मुंबई सोडायची नाही आता माघार नाही म्हणत जरांगे पाटील यांनी आंदोलन विषयीची भूमिका मांडली.
दरम्यान बैठकी नंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत छगन भुजबळ अणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाना साधला. जरांगे पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाणून बुजून मराठा समाजाचा छळ सुरू केला आहे. नोंदणी मिळाल्या त्यांना प्रमाणपत्र दिले जाऊ देत नाही,महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया संपल्या नंतर प्रमाणपत्र दिले जात आहे. ज्यांच्याकडे प्रमाणपत्र आहे त्यांच्या पडताळण्या रोखल्या आहेत, नोकर्यांच्या कामासाठी त्यांना पडताळणी दिली जात नाही. शिंदे समितीला एक वर्षाची मुदतवाढ दिली नाही. आरक्षणासाठी ज्यांनी बलिदान दिले त्यांच्या वारसांना नोकर्या नाहीत, त्यांचा निधी रोखण्यात आला आहे, हे कुठंतरी रोख लावण्याचं काम पुढच्या काळात मराठा समाजाला करावं लागणार आहे.
कारण त्याने असं ठरवलंय की दंगल घडवून आणायची ओबीसी आणि मराठ्यांची छगन भुजबळच्या माध्यमातून असा त्याचा पण आहे आणि तसा पायंडा मोंडलेला आहे. अजित पवार यांनी छगन भुजबळ यांना मंत्रीपद दिलं अशी वावटळ उठवायची होती परंतु तसं नाही. कारण त्याचं काम असं आहे झालकी वापरून फेकून देणारा माणूस म्हटलं की राज्यात कोण तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे. गरज होती तो पर्यंत शिंदे साहेबांना जवळ केलं आता शिंदेची गरज संपली तर अजित पवारांना जवळ घेतल,त्यांची गरज संपेल आणखी कोणाला तरी जवळ घेईल.
भाजपमधल्या संगळ्या मंत्री आमदारांना त्यांचा त्रास आहे आणि तेच वावडी उठवितात. पण तसं घडलेलं नाही आम्हाला माहिती मिळतेय की, छगन भुजबळ यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रीपद दिलं आहे. मराठा - ओबीसी दंगल घडवून आणण्यासाठी दिलंय मराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी दिलंय. माझ आसं मत आहे की बाबाहो तुमचं पोट भरतच नाही का? आमच्या लेकीबाळी सुद्धा सोडल्या नाही त्यांच्यावर हल्ला केला, आमच्या माहिलांवर हल्हा केला त्यांना सोडलं नाही, लाखो मराठ्यांच्या पोरांवर हल्ला केला पोट नाही भरलं का? आनखी लाखो मराठ्यांच्या पोरांवर केसेस पण केल्या.
संतोष भैय्या देशमुख प्रकरणातील सर्व सहआरोपी पण सोडून दिले. तुमचं पोट भरतच नाही. का मराठ्यांवरच अन्याय आमच्या लेकीबाळींचे कुंकू पुसलयं मराठा आरक्षणासाठी ज्यांनी बलिदान दिलंय त्या माय माऊल्या हात छोटे-छोटे तळहाताएवढे लेकरं घेवून सांभाळतायत त्यांच्यावर सुद्धा अन्याय केला जातोय. नोकरी दिली जात नाही, त्यांचा ठरलेला निधी दिला जात नाही. हे पहा सरकार सुधरा लई माघात पडल, छगन भुजबळ जाईल इथ गरीब मराठ्यांचं गोरगरीब ओबीसींच वाटोळं करू नका तुम्हाला हे जड जाईल. सुधरा आमच्या आरक्षणाला विरोध करायला छगन भुजबळला सांगू नका.
दरम्यान, पत्रकांरांनी गिरिष महाजन यांच्या ‘ मंत्रिपदच काय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनात आणले तर छगन भुजबळ हे तिसरे उपमुख्यमंत्री ठरतील” या वक्तव्यावरून या जरांगे पाटील यांना प्रश्न विचारला असता जरांगे पाटील संतापून म्हणाले की, हे काय आहे यामध्ये खरी चूक मराठा मंत्री आमदार, खासदारांची आहे त्यांना जाणून बुजून लादलं जातय हे मराठ्यांच्या आमदार मंत्र्यांना माहित आहे. जो कावा म्हणतात ना तो हा कावा आहे, हे कळू देत नाहीत.
छगन भुजबळला वाटतंय मला मोठेपण दिलंय पण तुझ्या हातून त्यांना पाप घडवून आणायचंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी नेत्यांची एक फळी तयार केली ती मराठ्याच्या विरोधात सोडायची आता हे मराठ्यांच्या मंत्री, आमदार, खासदारांचे कसकाय डोळे उघडत नाहीत त्यांना कळत नाही का? जाणून बुजून आपल्या जातीच्या विरोधात ठराविकांना आग ओकायला लावलं जातय. कळंत नाही यांना शेन खातेत हे, आपल्या जातीचं वाटोळ व्हायला लागलंय हे कळत नाही का त्यांना. मुख्यमंत्री फडणवीस असा माणुस होणार आहे एकदिवस लक्षात ठेवा सगळ्यात राजकाणातून संपलेल्या मणुस होणार आहे.
मराठ्यांचं आरक्षण देवून टाका दगंली घडवायचं बंद करा अन्यथा खूप वाईट परिस्थिती निर्माण होईल. हे महाजन- फाजन काय बेंडक्या कुठ बी ओरडत्यात नदीतल्या नाहीत गटारातल्या बेंडक्या आहेत या, आसल्यांना काही किंमत नाही मुख्यमंत्री फडणवीस जवळ. भाजपमधल्या सुद्धा सगळ्या मंत्री,आमदारांचा सुद्धा वापर चालू आहे. आणि हे मी बोलेलं त्यांना पटत नाही पण हे सत्य त्यामुळे सध्या बोलतच नसतेत सगळ्यांचे हाल आहेत. सगळ्या आसल्या गोष्टी घडवून आणणारा व्यक्ती म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लक्षात ठेवा सगळं ईथचं फेडावं लागतं एक दिवस सगळ्या पक्षातले मंत्री आमदार यांच्या असे पाठीमागे लागतील कारण यांनी लई जणांचा सूड घेतला आहे. आणि आता त्यांना शेवट दंगल घडवून सूड घ्यायचाय मराठ्यांचा, मराठ्यांना अरक्षण नाही द्यायचं पण दंगल भुजबळ च्या हातानी करायची, मोर्चे काढायला लावायचे, कुठं काही बडबड करायला लावयची काही तरी करायला लावचं, मराठ्यांच्या सगळ्या पक्षातील मंत्री, आमदारांनी त्यांच्यावर तुटू पडलं पाहिजे अन्यथा मराठे तुम्हाला गावात फिरू देणार नाहीत असा मराठा आमदार, मंत्र्यांवरही संताप व्यक्त केला.
Comments