जरांगे पाटील उपचार घेत असलेल्या हॉस्पीटलच्या सुरक्षेत वाढ
- Navnath Yewale
- Oct 7
- 2 min read

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे छत्रपती संभाजी नगर येथील गॅलेक्सी हॉस्पीटलमध्ये उपचार घेत आहेत. जरांगे पाटील उपचार घेत असलेल्या हॉस्पीटलच्या सुरक्षेत काल पासून वाढ करण्यात आली आहे. मराठा-ओबीसी नेत्यामध्ये टोकाचे बोलले जात असल्याने सुरक्षेत वाढ केल्याचे साृंगण्यात येत आहे.
मराठा समसाज कुणबी आरक्षणासाठी सुसूत्रता आणण्यासाठी सरकारने हैदराबाद गॅझेटिअरचा जीआर काढला. जीआर विरोधात मंत्री छगन भुजबळ, आमदार विजय वडेट्टीवार, लक्ष्मण हाके आदी ओबीसी नेत्यांनी गॅझेटिअर जीआर रद्द करण्याची मागणी केली. दरम्यान मनोज जरांगे विरुद्ध ओबीसी नेते असं टोकाचं वाक्युद्धच सध्या पेटल्याचे पाहायला मिळत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या ओबीसी नेत्यांच्या बैठक झाली. त्यानंतर दोन्ही बाजूने एकमेकांवर टीकेंची पातळी ओलांडली जात आहे. त्यामुळे जरांगे पाटील उपचार घेत असलेल्या छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी हॉस्पीटलच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. पोलिस प्रशासनाने दोन अधिकारी दहा कर्मचार्यांसह महिला कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, दोन्ही बाजून टोकाची टीका होत असल्याने अनुचित प्रकार टाळण्यासाठी सुरक्षेत वाढ केल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
आम्ही दिल्लीत तज्ज्ञांची बैठक घेऊन निर्णय घेणार: मराठा समाजास आरक्षण मिळालं की त्याला कोर्टात चॅलेंज केलं जातय. यापूर्वी तीन वेळा चॅलेंज केलं गेल. आम्ही कधी कोणाच्या विरोधात आम्ही कोर्टात गेलो नाहीत, राणे समितीनं दिलेलं, गायकवाड आयोगाने दिलेलं, आणि दहा टक्के दिलेलं तेही चॅलेंज केलं. आम्ही नुसतं बघत राहायचं आमचं कधी वाटोळं होतंय. आता नाही आता जशास तसं वागायचं, तुम्ही आमच्या आरक्षणाला चॅलेंज करत आहात तर आता आम्ही ही तुमच्या आरक्षणाला चॅलेंज करणार आहोत. मी लवकरच दिल्लीला जाऊन सुप्रीम कोर्टातील तज्ज्ञांची बैठक घेवून सन 1994 चा जीआर रद्द करण्यासाठी चॅलेंज करणार आहोत. सुरवात तुम्ही केलेली आहे. 1994 चा जीआर कसा रद्द होत नाही ते मी पाहातो आता. मला आता सन 1967 पासून 2023 पर्यंत कोणत्या जाती कोणत्या निकषांवर आरक्षणात घातल्या ही माहिती पाहिजे.
बबनराव तायवाडे यांच्या वक्तव्यावर जरांगे पाटील म्हणाले आगोदार छगन भुजबळांवर गुन्हे दाखल करा आंबड आणि पुण्याच्या सभेत कोयते, तलवारीची भाषा केली त्यावर आगोदर गुन्हे दाखल करा. मी उद्याच सुट्टी घेऊन दिल्लीला जाणार आहे. लाभार्थी टोळी परळीची एवढीसी आहे त्यांचं मतदानच नको, मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलणार्या ओबीसी नेत्यांचं राजकिय करिअर संपवावा लागेल. मराठ्यांनी जशास तसं वागा आता. काँग्रेसच्या वरिष्टांनी वडेट्टीवार यांना मराठा आरक्षणाला विरोध करायचं सांगितलं आहे. काँग्रेसमध्ये अनेक नेते चांगले आहेत. पण याला (वडेट्टीवार) पुढं केलं आहे. असं म्हणत जरांगे पाटील यांनी बबनराव तायवाडे, छगन भुजबळ यांनी केलेल्या टीकेला प्रत्यूत्तर दिले.
बबन तायवाडेंचा जरांगेवर हल्लाबोल: जातिय तेढ निर्माण करणारे बेताल वक्तव्य करत जरांगे पाटील ओेबीसी नेत्यांना टारगेट करत आहेत. ओबीसी नेत्यांना टारगेट करत असताल तर आम्ही काय भांडे घासत बसू का? ओबीसी मध्ये 400 जाती आहेत, ओबीसी नेत्यांच्या विरोधात बेताल वक्तव्य करणार्या जरांगे पाटील यांच्यावर गुन्हादाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनरावा तायवाडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.



Comments