top of page

जरांगे पाटील-प्रसाद लाड यांच्या भेटीनंतर, मंत्री विखे पाटलांची प्रतिक्रिया

मुंबई : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी येत्या 30 मे पासून पून्हा अमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. आज भाजपाचे नेते प्रसाद लाड यांनी त्यांची भेट घेऊन मनोज जरांगे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. की, उपोषण करू नये अशी विनंती लाड यांनी त्यांना केली आहे. मात्र, मनोज जरांगे आपल्या उपोषणावर ठाम आहेत. या संदर्भात मंत्री राधाकृष्ण पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.


राधाकृष्ण विखे- पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलाताना म्हणाले की, प्रसाद लाड मला भेटले होते आणि त्यांनी मला सांगितले की, ते जरांगे पाटील यांना भेटायला जाणार आहेत. सरकारने जी सकारात्मक भूमिका घेऊन जे निर्णय केले आहेत, त्याची कल्पना बहूतेक प्रसाद लाड यांनी त्यांना दिलेली असावी. त्यांची आणि जरांगे पाटील यांची काय चर्चा झाली? याबाबत मी प्रसाद लाड यांच्याशी चर्चा करेन आणि त्यानंतर भाष्य करणे योग्य राहील असे विखे पाटील म्हणाले.


आपन जरांगे यांच्या मागणीनुसार शिंदे समितीला एक वर्षापूर्वी मुदवाढ दिली होती. न्यायमूर्ती शिंदे यांची लोकआरयुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे. मात्र त्यापूर्वी त्यांनी त्यांच्याकडे असलेले काम केले आहे असे मला त्यांनी अश्वासन दिले आहे. राहिला प्रश्न हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेटच्या अंमलबजावणीचा आणि कुणबी दाखले देण्यासंदर्भातील कारवाईचा.. ते काम तर सुरूच आहे. शासनाकडून त्यांच्यापर्यंतची जी माहिती जात आहे, आणि आमच्या चर्चेतून मार्ग निघेल असा मला विश्वास आहे असंही मंत्री विखे पाटील म्हणाले.


दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस सहाकर्य करत नसल्याची जरांगे यांची तक्रार आहे या संदर्भात विखे-पाटील म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या पुढाकरानेच आम्ही या आंदोलनाला सामोरे गेलो, अध्यक्ष म्हणून ज्यावेळी मी काम करतो त्यावेळेस मुख्यमंत्री साहेब त्याचा सातत्याने आढावा घेतात, दाखले लवकर देण्यासंदर्भात त्यांचा सातत्याने आग्रह आहे. शेवटी असे आहे की कायद्याच्य चौकटीत राहून ते काम करायचे असतात, त्याला काही मर्यादा असतात,तरी शासनाची भूमिका ही सकारात्मक आहे असेही ते म्हणाले.

Comments


bottom of page